कोल्हापूर: खुल्या वर्गातील आंतरजिल्हा बदल्यांसाठी कोल्हापुरात आज शिक्षकांनी एल्गार पुकारला आहे.


आरक्षित जागेसाठी त्या-त्या प्रवर्गातील शिक्षकांची निवड झाली आहे, मात्र त्याची नोंद खुल्या प्रवर्गात झाली आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची संधी हुकत असल्याचा दावा ओपन संघर्ष समितीने केला आहे.



यासाठी ओपन संघर्ष समितीने कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर धरणं आंदोलन केलं. रोष्टरची पुनर्तपासणी करुन, नवं रोष्टर करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे.

बिंदू नामावली तयार करताना निवड याद्या, निवड प्रवर्ग नसणं अशा त्रुटी आहेत. शिवाय आरक्षित बांधवांची आरक्षित प्रवर्गामध्ये निवड होऊनही, त्यांची नोंद खुल्या प्रवर्गात करण्यात आली आहे, असा आरोप शिक्षकांच्या ओपन संघर्ष समितीने केला आहे.

शिक्षकांचा आक्षेप आणि मागण्या काय?

  • निवड प्रवर्ग मागास असूनही रोष्टरमध्ये अनेक मागासवर्ग बांधव खुल्या प्रवर्गात दर्शविले आहेत

  • निवड याद्या उपलब्ध नाहीत

  • अनेक शिक्षकांची नियुक्ती कोणत्या प्रवर्गात झाली याची नोंद नाही

  • वस्तीशाळा शिक्षकांचे बिंदू निश्चितीकरणादरम्यान शासन निर्णयाकडे कानाडोळा

  • वयाची सूट घेतलेल्या मागासवर्गीय शिक्षकांची नियुक्ती ओपन बिंदूवर दर्शवली आहे.