एक्स्प्लोर

World Cup 2019 : ...म्हणून टीम इंडियामध्ये रिषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला संधी : विराट कोहली

विश्वचषक स्पर्धेसाठीच्या टीम इंडियामधील दिनेश कार्तिकच्या या निवडीबाबत अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. परंतु रिषभ पंतला वगळून कार्तिकला संधी का देण्यात आली आहे? याबाबत स्वतः टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने माहिती दिली आहे.

मुंबई : पुढील आठवड्यात भारतीय क्रिकेट संघ जगातील सर्वात मोठी क्रिकेट टुर्नामेंट असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. काही दिवसांपूर्वी त्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला वगळून निवड समितीने दिनेश कार्तिकला संधी दिली आहे. कार्तिकच्या या निवडीबाबत अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. परंतु रिषभला वगळून कार्तिकला संधी का देण्यात आली आहे? याबाबत स्वतः टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने माहिती दिली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहली म्हणाला की, "संघ अडचणीत आलेला असताना, दबावात असताना चांगली खेळी करुन दिनेश कार्तिकने स्वतःला सिद्ध केले आहे. कार्तिककडे अनुभव आहे. देव न करो महेंद्रसिंह धोनीला काही झालं तर कार्तिक यष्टीरक्षक म्हणूनही तितकाच उपयोगी पडणार आहे. एक मॅचफिनिशर म्हणूनही कार्तिकने अनेकदा चांगले प्रदर्शन केले आहे. या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर आणि विश्वचषकाचा विचार करुन आम्ही कार्तिकची संघात निवड केली आहे." खूप काळापासून टीम इंडियाचा भाग असलेल्या दिनेश कार्तिकला अनेकदा संघाच्या आत-बाहेर करावे लागले आहे. परंतु मागील वर्षी आयपीएलमध्ये कार्तिकने खूप चांगले प्रदर्शन केले होते. त्यामुळे कार्तिकला भारतीय संघात स्थान देण्यात आले. मिळालेल्या संधींमध्येदेखील कार्तिकने अनेकदा चांगली फलंदाजी केली आहे. त्यामुळेच निवड समितीने विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात कार्तिकची निवड केली आहे. मी तर धोनीचा 'फर्स्ट एड किट' : दिनेश कार्तिक दरम्यान विश्वचषक संघातील निवडीबाबत प्रतिक्रिया देताना कार्तिक म्हणाला की, "महेंद्रसिंह धोनी मैदानावर आहे, तोवर मी संघाबरोबर असणारे एक छोटेसे फर्स्ट एड किट (प्रथमोपचार पेटी) असेन." कार्तिक म्हणाला की, "माझी विश्वचषकासाठी संघात निवड झाली आहे. याचा मला खूप आनंद आहे. परंतु संघातील माझ्या रोलबाबत मी म्हणेन की, महेंद्रसिंह धोनी मैदानावर खेळतोय तोवर मी संघाबरोबर असणारे एक छोटेसे फर्स्ट एड किट (प्रथमोपचार पेटी) असेन. कोणत्याही कारणामुळे धोनीला एखादा सामना खेळता आला नाही, तर त्याच्या जागी मला संधी मिळेल. त्या एका दिवसासाठी मी संघात बॅन्ड एडची भूमिका निभावेन."

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-2 Live : पाऊस थांबला... गॉलमध्ये अखेर टीम इंडियाच्या खेळाला मुहूर्त मिळाला! किती वाजता सुरू होणार मॅच? जाणून घ्या LIVE अपडेट्स
पाऊस थांबला... गॉलमध्ये अखेर टीम इंडियाच्या खेळाला मुहूर्त मिळाला! किती वाजता सुरू होणार मॅच? जाणून घ्या LIVE अपडेट्स
WTC Points Table 2025-27 : बांगलादेश जिंकला, पण टीम इंडियाचं वाटोळं झालं, ऑस्ट्रेलिया हरल्यावर WTC टेबलमध्ये कोण वर, कोण खाली?
बांगलादेश जिंकला, पण टीम इंडियाचं वाटोळं झालं, ऑस्ट्रेलिया हरल्यावर WTC टेबलमध्ये कोण वर, कोण खाली?
IND vs SL 1st Test : पहिली कसोटी पावसाने घातला घोळ; सामना ड्रॉ झाला तर टीम इंडिया WTC च्या शर्यतीतून OUT?, जाणून घ्या फायनलचं समीकरण
पहिली कसोटी पावसाने घातला घोळ; सामना ड्रॉ झाला तर टीम इंडिया WTC च्या शर्यतीतून OUT?, जाणून घ्या फायनलचं समीकरण
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Embed widget