Giant Sunspot Facing Earth : जगभरातील शास्त्रज्ञांची अवकाशात करडी नजर असते. अंतराळातील प्रत्येक हालचालींवर शास्त्रज्ञ लक्ष ठेवून असतात. सूर्य (Sun) हा आपल्या सौरमालेतील महत्त्वाचा भाग आहे. सूर्यामुळे पृथ्वीवर (Earth) जीवन आहे. त्यामुळे सूर्यावरील घडणाऱ्या बदलांचा परिणाम पृथ्वीवर होऊ शकतो. यामुळे शास्त्रज्ञ सूर्य ग्रहावर होणाऱ्या बदलांचं बारीक निरीक्षण करतात. आता शास्त्रज्ञांना सूर्यावर एक मोठा सनस्पॉट (Massive Sunspot) आढळून आला आहे. अवघ्या 24 तासांत या सनस्पॉटचा आकार दुप्पट झाला आहे. हा सनस्पॉट पृथ्वीच्या दिशने तोंड करुन आहे. हा सनस्पॉट्स फुटल्यास सौर ज्वाला आणि भूचुंबकीय वादळ तयार होण्याची शक्यता आहे. 


सनस्पॉट म्हणजे काय?


सनस्पॉट म्हणजे सूर्यप्रकाशातील गडद भाग. चुंबकत्वामुळे सूर्यावर जे गडद भाग (डाग किंवा ठिपका) (Sunspot) तयार होतो याला 'सनस्पॉट' असं म्हणतात. सनस्पॉट्स काही तासांपासून काही महिने टिकू शकतात. सर्व सनस्पॉट्समुळे सौर ज्वाला तयार होत नाहीत, मात्र याचा पृथ्वीवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.


सौर ज्वाला (Solar Flare) म्हणजे काय?


जेव्हा सूर्याची चुंबकीय ऊर्जा बाहेर फेकली जाते तेव्हा प्रकाश आणि त्यातून उत्सर्जित कणांपासून सौर ज्वाला तयार होतात. सौर ज्वाला आपल्या सूर्यमालेतील सर्वात शक्तिशाली स्फोट मानल्या जातात. या सौर ज्वाला कोट्यवधी हायड्रोजन बॉम्बच्या तुलनेत अधिक ऊर्जा सोडतात.


पृथ्वीवर काय परिणाम होणार?


सूर्यावरील सनस्पॉटचा स्फोट झाल्यास याच्या ज्वाला पृथ्वीवर आदळण्याची शक्यता नाही. ही चांगली बातमी आहे. पण हा सनस्पॉट वाढत राहिल्यास याचा परिणाम पृथ्वी वर होऊ शकतो. AR3038 नावाच्या सनस्पॉटबाबत शास्त्रज्ञांनी सांगितलंय की, सनस्पॉटचा आकार फार कमी वेळात दुप्पट झाला आहे. 


M-क्लास म्हणजे काय?
सूर्यापासून तयार होणाऱ्या वादळांचे वर्गीकरण त्यांच्या तीव्रतेनुसार केलं जातं. यामुळे शास्त्रज्ञांना सौर वादळ किती धोकादायक आहे हे ठरवता येतं. खाली दिलेल्या मुद्द्यांवरून समजून घ्या. या वर्गीकरणातील सर्वात कमकुवत सौर वादळे वर्ग A, B आणि C मध्ये मोडतात. M-क्लास वादळं सर्वात धोकादायक आणि शक्तिशाली असतात आणि ते पृथ्वीला धडकण्याची शक्यता असते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :