एक्स्प्लोर

विराट कोहलीची विशेष क्लबमध्ये एन्ट्री; असं करणारा सहावा भारतीय क्रिकेटर

IND Vs NZ WTC Final 2021: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दुसर्‍या दिवशी विराट कोहली 44 धावांच्या खेळीसह नाबाद राहिला. कोहलीने आपल्या छोट्या खेळीत एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

IND Vs NZ WTC Final 2021: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जात आहे. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली 44 धावांवर नाबाद राहिला. या छोट्या खेळीदरम्यान विराट कोहलीने भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढतानाच एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये 7500 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या पंक्तीत विराट कोहली बसला आहे. 92 कसोटी आणि 154 डाव खेळत विराट कोहलीने हे स्थान मिळवलं आहे. विराट कोहलीच्या अगोदर केवळ 6 भारतीय खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये 7500 पेक्षा जास्त धावा करू शकले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नावावर 27 शतके आणि 25 अर्धशतके आहेत.

धोनीना टाकले मागे
अंतिम सामन्यात मैदानात उतरताच विराट कोहलीने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहे. विराट कोहली हा भारतासाठी सर्वाधिक कसोटी सामन्यांसाठी संघाचा कर्णधार ठरला आहे. कर्णधार म्हणून विराट कोहलीची ही 61 वी कसोटी आहे. यापूर्वी बहुतेक कसोटींमध्ये भारताचे नेतृत्व करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर होता. धोनीने 60 कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते आणि त्यापैकी 27 सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला होता.

विराट कोहली हा कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. 2014 मध्ये ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार झाला होता. विराट कोहलीने आतापर्यंत 36 कसोटी सामन्यात भारताला विजय मिळवून दिला आहे.

कसोटी क्रमवारीत विराट कोहली सध्या चौथ्या स्थानी आहे. विराट कोहलीने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात शतक झळकावल्यास त्याला आयसीसी कसोटी क्रमवारीत आपले स्थान मजबूत करण्याची संधी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli Record : ऑकलंडमध्ये विराट कोहलीचा ऐतिहासिक धमाका! मोडले सचिनचे 2 विक्रम, तिसऱ्या क्रमांकावर असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज
ऑकलंडमध्ये विराट कोहलीचा ऐतिहासिक धमाका! मोडले सचिनचे 2 विक्रम, तिसऱ्या क्रमांकावर असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज
IND vs NZ 1st ODI : पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामन्यात ट्विस्टवर ट्विस्ट, दोनदा बदललं लक्ष्य; अखेर विराट कोहलीच्या जोरावर टीम इंडियाचा विजय
पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामन्यात ट्विस्टवर ट्विस्ट, दोनदा बदललं लक्ष्य; अखेर विराट कोहलीच्या जोरावर टीम इंडियाचा विजय
IND vs NZ 1st ODI Score : वनडे मालिकेतही टीम इंडियाची विजयी सलामी! न्यूझीलंडचा 5 विकेट्सनं पराभव
IND vs NZ 1st ODI : वनडे मालिकेतही टीम इंडियाची विजयी सलामी! न्यूझीलंडचा 5 विकेट्सनं पराभव
IND vs NZ 1st ODI : 6 चेंडूंचा ड्रामा! न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत तीन वर्षांनंतर रोहित शर्मासोबत नको ते घडलं, सगळेच शॉक
6 चेंडूंचा ड्रामा! न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत तीन वर्षांनंतर रोहित शर्मासोबत नको ते घडलं, सगळेच शॉक

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
Embed widget