Bollywood Biopic Movies : सध्या बॉलिवूडमध्ये अनेक बायोपिक (Biopic) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. गेल्या काही वर्षांपासून बायोपिकची निर्मिती वाढताना दिसत आहे. दिवंगत अभिनेता इरफान खानचा (Irfan Khan) 'पान सिंह तोमर', सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) स्टारर 'एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी' और प्रियंका चोप्राचा चा 'मैरीकॉम' असे अनेक बायोपिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. यातील अनेक सिनेमे ब्लॉकब्लस्टर ठरले होते. अनेक बायोपिक सिनेमे फ्लॉपही ठरले होते. दरम्यान, आता चालू वर्षात एक-दोन नाही तर चालू वर्षात तब्बल 6 बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 


बॉलिवूडमधील काही बायोपिक कधी येणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. चालू वर्षात रिलीज होणाऱ्या 5 बायोपिकपैकी 3 सिनेमे हे स्पोर्ट्शी निगडीत आहेत. गेल्या वर्षी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित 'मै अटल हूं' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र, या सिनेमाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. सिनेमा पूर्णपणे फ्लॉप ठरलाय. या सिनेमात अभिनेता पंकज त्रिपाठी याने अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली होती. 


स्वातंत्र्यवीर सावरकर 


स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित सिनेमाही याच वर्षात रिलीज होणार आहे. अभिनेता रणदीप हुड्डा याने या सिनेमात सावरकरांची भूमिका साकारली आहे. या सिनेमात सावरकर इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात लढताना दाखवण्यात येणार आहेत. या सिनेमात अभिनेत्री अंकिता लोखंडेचीही महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. 




‘इमर्जन्सी’


अभिनेत्री कंगणा राणावत ‘इमर्जन्सी’या सिनेमात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. या सिनेमातून भारतीय राजकारणाचा इतिहासच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी देशात आणिबाणी लागू केली होती. याला लोकांना रस्त्यावर उतरुन विरोध केला होता. हा सिनेमा 16 जून 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


अजय देवगणच्या मैदानची प्रेक्षकांना आतुरता


अभिनेता अजय देवगण याच्या मैदान या सिनेमाबाबत कमालीची उत्सुकता आहे. या सिनेमाबाबत 2019 मध्ये घोषणा करण्यात आली होती. या सिनेमातून भारतीय फूटबॉल टीमचे प्रशिक्षक सईद अब्दुल रहिम यांचे आयुष्य पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. टीझरमधून हा सिनेमा या वर्षातच प्रदर्शित होईल, असे सांगण्यात आले आहे. याशिवाय अजयचा रेड 2 ही रियल आयुष्यावर आधारित असणार आहे. 




चंदू चॅम्पियन 


अभिनेता कार्तिक आर्यन चंदू चॅम्पियन या सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे. सिनेमात तो एका अॅथलीटची भूमिका निभावेल. हे पॅरा ऑलंप्मिक गोल्ड मेडलिस्ट मुरलीकांत पेटकर यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. हा सिनेमा 14 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


'Chakda'Xpress'


भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी हिच्या आयुष्यावर देखील सिनेमा बनत आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा या सिनेमात झूलनची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'Chakda'Xpress' असे या सिनेमाचे नाव आहे. अद्याप अनुष्काच्या या सिनेमाची रिलीज डेट ठरलेली नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Shilpa Shetty : शिल्पा शेट्टी 'चक्की पीसिंग', सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल