Chandrashekhar Bawankule : शिवसेनेचा अंत जवळ आला आहे, देशातील प्रादेशिक पक्ष संपून जातील, आणि फक्त भाजप राहिलं, असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी समर्थन केलं आहे. नड्डा  अगदी बरोबर बोलले आहेत. आम्ही 400 प्लस होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करतोय, असे बावनकुळे यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना म्हटले आहे. दरम्यान,मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला वारंवार जाण्याचा अर्थ फक्त मंत्रिमंडळ विस्तारासाठी असा काढू नये ते जेवढ्या वेळ गेले ते विकास कामांसाठीच गेले असा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला. 


यावेळी बोलताना बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील 16 लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्र्यांचा लोकसभा प्रवास दौरा सुरू होणार असल्याचे म्हटले आहे. कोल्हापूरला केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार, तर हातकणंगलेसाठी बघेलजी दौऱ्यावर असतील. बारामती ला निर्मला सीतारामण असतील. ते मतदारसंघाचा आढावा घेणार असल्याचे ते म्हणाले. 


400 लोकसभेचा जागा जिंकण्याचे टार्गेट 


महाराष्ट्रामधील  भाजप नसलेल्या 16 मतदारसंघात जिंकणारच हा ध्येय ठेऊन कार्यक्रम हाती घेतल्याचे बावनकुळे म्हणाले. मंत्र्यांच्या या दौऱ्यामध्ये काही पक्ष प्रवेशही होतील, असा दावा त्यांनी केला. जेपी नड्डा अगदी बरोबर बोलले, आम्ही 400 प्लस होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत आहोत. राज्यात आणि देशात आपला पक्ष एक नंबर असावा अशी आमचीही  इच्छा असतेच. प्रादेशिक पक्ष संपवण्याचा प्रयत्न भाजपने केला नसल्याचे ते म्हणाले.  काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्यावरच उद्धव ठाकरे यांना भाजप  प्रादेशिक पक्षांना संपवत आहे असं का वाटतं? अशी विचारणा त्यांनी केली.  


इतर महत्त्वाच्या बातम्या