एक्स्प्लोर

Vinod Kambli: विनोद कांबळी आर्थिक संकटात, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शोधतोय नोकरी

Vinod Kambli's Financial Condition: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासह कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय.

Vinod Kambli's Financial Condition: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासह कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. एवढेच नव्हे तर, कुंटुबाच्या उदरनिर्वाहरसाठी त्यांच्याकडं पैसे नसून ते नोकरीच्या शोधात आहे. त्यानं स्वत: एका मुलाखतीत सांगितलं आहे. 

मिड डे वृत्तपत्रला दिलेल्या मुलाखतीत विनोद कांबळी म्हणाला की, "मी एक निवृत्त झालेला क्रिकेटपटू आहे आणि पूर्णपणे बीसीसीआयच्या पेन्शनवर अवलंबून आहे. माझ्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत बीसीसीआय आहे आणि त्यासाठी मी त्यांचा खूप आभारी आहे. याच पैशातून माझ्या कुटुंबाचा खर्च भागवतो. मला नोकरीची गरज आहे. मुंबईनं अमोल मजुमदार यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून ठेवलंय. परंतु त्यांना माझी गरज असल्यास मी उपलब्ध आहे. मी मुंबईसाठी खेळलो आहे आणि म्हणूनच त्यानं माझ्यासाठी काहीतरी करावं असं मला वाटतं."

सचिनला कांबळीच्या परिस्थितीची कल्पना
"मी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडं गेलो होतो. मला माझं घर चालवायचं आहे. मी अनेकदा एमसीएला माझी गरज भासल्यास मी येईल, असं म्हणालोय. सचिन तेंडुलकरला माझ्या परिस्थितीची कल्पना आहे. त्यानं या आधीही माझी मदत केलीय. त्याने माझ्याकडे तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकॅडमीची जबाबदारी सोपवली होती. तो माझा खूप चांगला मित्र आहे. मी आता त्याच्याकडून मदतीची आशा ठेवत नाही."

विनोद कांबळीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
विनोद कांबळीनं आपल्या कारकिर्दीत भारतासाठी 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या 1084 धावा आणि कसोटीत 2477 धावा आहेत. लहानपणी तो सचिनसोबत क्रिकेट खेळायचा. त्यानं आपल्या कारकिर्दीची सुरुवातही दमदार पद्धतीनं केली. पण नंतर तो आपला फॉर्म कायम राखू शकला नाही आणि संघाबाहेर गेला.

याप्रकरणात झाली होती अटक
यावर्षी मार्च महिन्यात विनोद कांबळीला अटक केल्याची बातमी समोर आली होती. त्यानं 2 मार्च 2022 रोजी मुंबईतल्या त्याच्या कारच्या सोसायटीच्या गेटला कारनं धडक दिली होती. याच आरोपांखाली त्याला अटक करण्यात आली. या अटकेनंतर त्याची जामिनावरही सुटका करण्यात आली. विनोद कांबळीची त्या दिवसाची अवस्था दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलनTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 :  ABP MajhaAaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHAABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Embed widget