Vidya Balan on Rohit Sharma : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS Test Series) यांच्यामध्ये सिडनीच्या मैदानावर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळवला जात आहे. दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या चर्चेत आला आहे. सिडनी कसोटीतून माघार घेण्याचा निर्णय रोहितने (Rohit Sharma) घेतला. त्यानंतर रोहित टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले. मात्र, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्माने मोठा खुलासा केला आहे. रोहित कसोटीतून निवृत्त होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याला दिलेल्या मुलाखतीत रोहितने निवृत्तीचे वृत्त फेटाळून लावले आहे. दरम्यान, अभिनेत्री विद्या बालनने (Vidya Balan) रोहितबाबत खास पोस्ट लिहिली आहे.
रोहित शर्माबाबत लिहिलेल्या पोस्टमध्ये विद्या काय म्हणाली?
दरम्यान, रोहितने आज (दि.4) स्फोटक मुलाखत दिल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिने X या प्लॅटफॉर्मवरुन प्रतिक्रिया दिली आहे. "Rohit Sharma, what a SUPERSTAR 🤩!! To take a pause & catch your breath requires courage … More power to you … Respect", अशी प्रतिक्रिया अभिनेत्री विद्या बालन हिने व्यक्ती केली आहे.
रोहित शर्मा काय काय म्हणाला ?
रोहित शर्मा म्हणाला, चार-पाच महिन्यांपूर्वी माझे कर्णधारपद आणि माझ्या कल्पना कामी आल्या. अचानक या गोष्टी वाईट समजल्या जाऊ लागल्या. आज धावा होत नाहीत, पण भविष्यात तुम्हाला धावा करता येणार नाहीत, याची शाश्वती नाही. माईक, पेन किंवा लॅपटॉप घेऊन बसलेल्या लोकांच्या बोलण्याने आयुष्य बदलणार नाही. मी केव्हा निवृत्त व्हावे, कधी बाहेर बसावे, कर्णधारपद कधी स्वीकारावे हे ते ठरवू शकत नाहीत. मी एक समजूतदार माणूस आहे, दोन मुलांचा बाप आहे. त्यामुळे कधी काय करायचं हे मला माहीत आहे.
पुढे बोलताना रोहित शर्मा म्हणाला, प्रशिक्षक आणि निवडकर्त्याशी माझे संभाषण चांगलं आहे. मी धावा काढत नव्हतो, मी फॉर्ममध्ये नाही आणि हा महत्त्वाचा सामना आहे, त्यामुळे आम्हाला फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंची गरज आहे. ही साधी गोष्ट माझ्या मनात धावत होती. त्यामुळे मला असे वाटले की मी प्रशिक्षक आणि निवडकर्त्याला सांगावे की मी असा विचार करत आहे. त्यांनी माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला.
इतर महत्त्वाच्या बातम्या