Pune Officer Family : राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली तर अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले. नाराज असल्याच्या चर्चा असलेल्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) देखील उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं. दरम्यान, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यातील प्रशासनात मोठे बदल करण्यात आले आहेत. राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या . राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव व्ही. राधा यांच्या आदेशान्वये बदल्यांचे आदेश निघाले होते. 


सुहास दिवसे यांना प्रमोशन मिळालं अन् डुडी पुण्याचे जिल्हाधिकारी झाले 


राज्य सरकारने बदल्यांचे आदेश काढल्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी असलेल्या आणि पूजा खेडकर प्रकरणात चर्चेत आलेल्या डॉ. सुहास दिवसे (Suhas Diwase) यांना प्रमोशन मिळालं. दरम्यान, सुहास दिवसे यांची बदली झाल्यानंतर पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी (jitendra dudi) यांची नियुक्ती करण्यात आली. राज्य शासनाच्या आदेशान्वये राज्यातील दहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. तर काही अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली होती. 


जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी, पत्नी आंचल दलाल आयपीएस 


दरम्यान, राज्य सरकारकडून या बदल्या झाल्यानंतर पुणे जिल्ह्यात एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती महत्त्वाच्या पदांवर आल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. जितेंद्र डुडी (jitendra dudi)  यांना पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाचा पदभार देण्यात आल्यानंतर एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती पुणे जिल्ह्यात मोठ्या पदावर कार्यरत असल्याचं चित्र आहे. जितेंद्र डुडी (jitendra dudi)  हे पुण्याचे जिल्हाधिकारी आहेत. तर डुडी यांच्या पत्नी आंचल दलाल या आयपीएस असून त्या पुण्यातील राज्य राखीव दलात कार्यरत आहेत. याशिवाय त्यांचे भाऊ शेखर सिंह हे पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त आहेत. त्यामुळे पुण्यातील मोठ्या पदावर असलेल्या कुटुंबातील या सदस्यांचं कौतुक केलं जात आहे. 


काही दिवसांपूर्वी पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झालेले डुडी हे भाप्रसे च्या 2016 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांचा विवाह आयपीएस असलेल्या आंचल दलाल यांच्याशी झाला होता. यापूर्वी डुडी यांनी केंद्र सरकारमध्ये सहाय्यक सचिवपदी काम केलंय. जितेंद्र डुडी हे मूळचे राजस्थानचे मात्र, जिल्हाधिकारी झाल्यानंतर त्यांना झारखंडचं केडर मिळालं होतं.


जितेंद्र डुडी यांचे मेव्हणे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त 


डुडी यांचे मेव्हणे असलेल्या शेखर सिंह यांच्याकडे सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार आहे. यापूर्वी ते साताऱ्याचे जिल्हाधिकारी होते. यापूर्वी डुडी आणि शेखर सिंह या दोघांनाही सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी स्वीकारली होती. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Suresh Dhas : आकाचे आका करलो जल्दी तयारी, हम निकले है जेलवारी; सुरेश धस यांचा जोरदार हल्लाबोल; म्हणाले, अजितदादा क्या हुवा तेरा वादा...