एक्स्प्लोर

विदर्भाने इतिहास रचला, पहिल्यांदाच रणजी करंडकाचा मान

अक्षय वाखरे आणि आदित्य सरवटेच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर विदर्भाने दिल्लीचा दुसरा डाव 280 धावांत गुंडाळला.

इंदूर : इंदूरच्या होळकर स्टेडियमवर फैज फजलच्या विदर्भाने आज इतिहास रचला. बलाढ्य दिल्लीला नऊ विकेट्सने पराभूत करत विदर्भाने पहिल्यांदाच रणजी चषकावर आपलं नाव कोरलं. अक्षय वाखरे आणि आदित्य सरवटेच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर विदर्भाने दिल्लीचा दुसरा डाव 280 धावांत गुंडाळला. दिल्लीकडून मिळालेलं 29 धावांचं सोपं लक्ष्य विदर्भाने एका विकेटच्या बदल्यात पार केलं. विदर्भाकडून दुसऱ्या डावात अक्षय वाखरेने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर आदित्य सरवटेने तीन फलंदाजांना माघारी धाडलं. रजनीश गुरबानीने दोन तर आदित्य सरवटे आणि सिद्धेश नेरळने प्रत्येकी एक विकेट घेतली. रणजी करंडकाच्या 84 वर्षांच्या इतिहासात विदर्भाने रणजी करंडक जिंकण्याची ही वेळ आहे. विदर्भाला आजवरच्या इतिहासात 1970-71 आणि 1995-96 या दोन मोसमात रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारता आली होती. पण यंदा फैज फझलच्या नेतृत्वाखालील विदर्भाच्या संघाने अंतिम सामन्यात धडक मारत आपली सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे. विशेष म्हणजे मुंबईचे माजी कसोटीवीर चंद्रकांत पंडित हे विदर्भ संघाचे प्रशिक्षक आहेत. रजनीश गुरबानीची हॅटट्रिक विदर्भाचा मध्यमगती गोलंदाज रजनीश गुरबानीने दिल्लीविरुद्धच्या अंतिम सामन्यात हॅटट्रिकची नोंद केली. रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हॅटट्रिक करणारा तो केवळ दुसरा गोलंदाज ठरला. याआधी 1973 साली रणजी करंडकाच्या फायनलमध्ये तामिळनाडूच्या बी कल्याणसुंदरमने मुंबईविरुद्ध हॅटट्रिक नोंदवली होती. रजनीशने दिल्लीच्या विकास मिश्रा, नवदीप सैनी आणि ध्रुव शोरे या फलंदाजंना माघारी धाडत हॅटट्रिक साजरी केली. विशेष म्हणजे रजनीशने आपल्या हॅटट्रिकमध्ये तिन्ही फलंदाजांना त्रिफळाचीत केलं. रजनीश गुरबानीने पहिल्या डावात हॅटट्रिकसह एकूण सहा विकेट्स घेतल्या. त्यामुळे विदर्भाने दिल्लीला 295 धावांत रोखलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

LSG vs PBKS Live Score Update : पंजाब किंग्सचा लखनऊ सुपर जायंट्सवर 7 गडी राखून विजय; श्रेयस अय्यर अन् प्रभसिमरन सिंग चमकले
LSG vs PBKS Live Update : पंजाब किंग्सचा लखनऊ सुपर जायंट्सवर 7 गडी राखून विजय; श्रेयस अय्यर अन् प्रभसिमरन सिंग चमकले
Jacob Bethell RCB IPL 2026 : क्वालिफायर सामन्यापूर्वी RCB संघाची ताकद झाली अर्धी, स्टार ओपनर अचानक लंडनला रवाना; नेमकं काय घडलं?
क्वालिफायर सामन्यापूर्वी RCB संघाची ताकद झाली अर्धी, स्टार ओपनर अचानक लंडनला रवाना; नेमकं काय घडलं?
LSG Vs PBKS IPL 2026 : वडिलांच्या नावाचा भार, टीकेचा मारा… पण अर्जुन तेंडुलकर अखेर मैदानात उतरला; लखनऊने दिली मोठी जबाबदारी
वडिलांच्या नावाचा भार, टीकेचा मारा… पण अर्जुन तेंडुलकर अखेर मैदानात उतरला; लखनऊने दिली मोठी जबाबदारी
IPL 2026 Playoff Scenarios : फक्त 3 मॅच बाकी, आता मुंबई इंडियन्स ठरणार 4 संघांचं भवितव्य! आयपीएलच्या प्लेऑफचं चक्रावणारं समीकरण
फक्त 3 मॅच बाकी, आता मुंबई इंडियन्स ठरणार 4 संघांचं भवितव्य! आयपीएलच्या प्लेऑफचं चक्रावणारं समीकरण

व्हिडीओ

Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचा उल्लेख, संजय घाडींचं नाव डावललं?
सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरणासाठी पालिकेचा मोठा निधी;भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचं नाव वाढवलं
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
Aditi Tatkare : रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’,मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ :आदिती तटकरे
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात
Embed widget