एक्स्प्लोर

विदर्भाचं सलग दुसऱ्या वर्षी रणजी करंडकावर नाव!

या सामन्यात विदर्भाने सौराष्ट्राला विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं होतं. पण आदित्य सरवटे आणि अक्षय वाखरे यांच्या फिरकी आक्रमणासमोर सौराष्ट्राचा दुसरा डाव 127 धावांत आटोपला.

नागपूर : फैझ फझलच्या विदर्भाने सलग दुसऱ्या वर्षी रणजी करंडकावर नाव कोरुन नवा इतिहास घडवला आहे. नागपूरच्या नव्या व्हीसीए स्टेडियमवरच्या अंतिम सामन्यात विदर्भाने सौराष्ट्रावर 78 धावांनी मात केली. या सामन्यात विदर्भाने सौराष्ट्राला विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं होतं. पण आदित्य सरवटे आणि अक्षय वाखरे यांच्या फिरकी आक्रमणासमोर सौराष्ट्राचा दुसरा डाव 127 धावांत आटोपला. डावखुरा स्पिनर आदित्य सरवटेने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात सहा फलंदाजांना माघारी धाडलं. अक्षय वाखरेनेही पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात तीन विकेट्स काढून आपल्या ऑफ स्पिनची कमाल दाखवली. सौराष्ट्रतर्फे विश्वराज जाडेजाने सर्वाधिक 52 धावा केल्या. मुंबई आणि महाराष्ट्र या थोरल्या भावंडांचं आव्हान यंदा रणजी करंडकाच्या साखळीतच संपुष्टात आलं होतं. त्यामुळं धाकट्या विदर्भाचं रणजी करंडकातलं घवघवीत यश अधिकच उठून दिसतं. विदर्भाच्या फायनलमधल्या विजयाचा आदित्य सरवटे हा प्रमुख शिल्पकार ठरला. सरवटेच्या डावखुऱ्या फिरकीनं रणजी फायनलला विदर्भाच्या बाजूने गिरकी दिली. त्याने अंतिम सामन्यात अकरा विकेट्स काढल्याच, पण सौराष्ट्राच्या चेतेश्वर पुजाराला दोन्ही डावांत मिळून केवळ एकच धाव करु दिली. पहिल्या डावात पुजाराने सरवटेच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये वासिम जाफरच्या हाती झेल दिला. दुसऱ्या डावात त्याला भोपळाही फोडता आला नाही. सरवटेने त्याला पायचीत केलं. याच पुजाराने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या चार कसोटी सामन्यांमध्ये तीन शतकांसह 521 धावांचा रतीब घातला होता. पण फायनलच्या रणांगणात सरवटेने त्याला घडवलेला धावांचा उपवास विदर्भाला रणजी करंडकाचा मान देणारा ठरला. विदर्भाच्या लोअर मिडल ऑर्डरने दोन्ही डावांत बजावलेली कामगिरी फायनलच्या लढाईत खूपच मोलाची ठरली. विदर्भाने पहिल्या डावात सहा बाद 139 धावांवरुन सर्व बाद 312 धावांची मजल मारली. अक्षय वाडकर, अक्षय कर्णेवार आणि अक्षय वाखरे या तीन नावबंधूंनी रचलेल्या छोट्या, पण झुंजार भागीदारी कमालीच्या होत्या. दुसऱ्या डावात आदित्य सरवटेने बॅट चालवली म्हणूनच विदर्भाने सहा बाद 105 धावांवरुन सर्व बाद 200 धावांची मजल मारली. विदर्भाच्या लोअर मिडल ऑर्डरची हीच कामगिरी रणजी करंडकाच्या अंतिम लढाईत निर्णायक ठरली. रणजी करंडकाच्या यंदाच्या अख्ख्या मोसमाचा विचार करायचा झाला, तर विदर्भाच्या अनुभवी शिलेदारांनी आपली कामगिरी चोख बजावली. पाहूया... * वासिम जाफर - यंदाच्या मोसमात अकरा सामन्यांमध्ये 69.13च्या सरासरीने 1053 धावांचा रतीब. * कर्णधार फैझ फझल - 11 सामन्यांमध्ये 50.13 च्या सरासरीने 752 धावा. * यष्टीरक्षक आदित्य वाडकर : 11 सामन्यांमध्ये 60.41 च्या सरासरीने 725 धावा. यष्टीपाठी 21 झेल आणि सहा यष्टिचीत. * गणेश सतीश : 11 सामन्यांमध्ये 33.80 च्या सरासरीने 507 धावा. * अष्टपैलू आदित्य सरवटे : 11 सामन्यांमध्ये 354 धावा आणि 53 विकेट्स. * ऑफ स्पिनर अक्षय वाखरे : 10 सामन्यांमध्ये 34 विकेट्स, त्यात अंतिम सामन्यात सात विकेट्स * वेगवान गोलंदाज उमेश यादव : अवघ्या तीन सामन्यांमध्ये 23 विकेट्स * ललित यादव : सहा सामन्यांमध्ये 19 विकेट्स यंदाच्या रणजी करंडकातल्या विदर्भवीरांची नावं तरी किती घ्यायची? विदर्भाच्या प्रत्येक शिलेदारानं आपली कामगिरी अगदी चोख बजावली. म्हणूनच चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भाला सलग दुसऱ्या वर्षी रणजी करंडकावर आपलं नाव कोरता आलं.

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Ind vs SL Test Series Schedule : टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
India vs Pakistan : ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget