नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. दरदिवशी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशातच सर्वांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. परंतु, अनेक जण हा नियम सर्राय मोडत असल्याचं दिसून येत आहे. 8 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदकावर आपलं नाव कोरणाऱ्या उसेन बोल्टसोबतही झालं आहे. जगातील सर्वात वेगवान धावपटू युसेन बोल्टला कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी बोल्टने आपला वाढदिवस साजरा केला होता. परंतु, त्या वाढदिवसाच्या पार्टीत कोणतचं सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आलं नव्हतं. तसेच कोणीही मास्क लावला नव्हता. उसेन बोल्टच्या या पार्टीत क्रिस गेल आणि प्रसिद्ध फुटबॉलपटू रहीम स्टर्लिग देखील होते.


मीडिया रिपोर्टनुसार, जमैकातील रेडियो स्टेशन 'नेशनवाइड90एफएम' यांनी युसेन बोल्टला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं आहे. तसेच त्यामुळे तो सेल्फ आयसोलेशनमध्ये राहणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. रिपोर्टमध्ये पुढे सांगण्यात आलं आहे की, 34 वर्षीय उसेन बोल्टची काही दिवसांपूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली होती. रविवारी त्याची कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.





उसेनचा 21 ऑगस्टला वाढदिवस होता. बोल्टने पार्टीनंतर कोरेनाची चाचणी केली, यानंतर तो पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं. या पार्टित क्रिकेटर ख्रिस गेल, फुटबॉलर रहीम स्टर्लिंग आणि लियॉन बैली देखील उपस्थित होते. याव्यतिरिक्त अनेक दिग्गजांनी या पार्टीला हजेरी लावली होती. बोल्ट याच्या 34 व्या वाढदिवसाचे फोटो सोशल मिडीयावर कमालीचे व्हायरल झाले होते. बोल्टनेही यासंदर्भात ट्वीट केलं आहे.


क्रिस गेल कोरोना नेगेटिव्ह


उसेन बोल्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या पार्टीत उपस्थित असलेल्या सर्वच खेळाडूनी धसका घेतला आहे. काही दिवसांवर आयपीएल असून आपलीएलच्या किंग्स इलेव्हन पंजाबचा धडाकेबाज खेळाडू क्रिस गेलही बोल्टच्या पार्टीत उपस्थित होता. आज क्रिस गेलची पहिली कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल नेगेटिव्ह आला आहे. यासंदर्भात स्वतः क्रिस गेलने माहिती दिली आहे. तसेच त्याला त्याच्या पुढच्या प्रवासासाठी आणखी दोन टेस्ट कराव्या लागणार असल्याचंही त्याने यावेळी सांगितलं आहे.


दरम्यान, बोल्ट ने 2017च्या लंडन विश्व अॅथलेटिक्स स्पर्धेत तिसरं स्थान पटकावल्यानंतर बोल्टने आपली निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर बोल्टने फुटबॉलमध्ये आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता. ऑक्टोबर 2018मध्ये ऑस्ट्रेलिया-ए लीगच्या टीम सेंट्रल कोस्टरल मरिनर्स सोबत सरावही केला होता.


महत्त्वाच्या बातम्या :


सौरभ गांगुलीने ममता सरकारची जमीन परत केली, बंगाल निवडणुकीआधी भाजप प्रवेशाची अटकळ


IPL 2020: विराट कोहली टीम RCB सोबत न जाता एकटा पोहोचला दुबईत, कारण...