एक्स्प्लोर

युवा खेळाडू चमकले, भारतीय अ संघाच्या वन डेत 458 धावा

या दोघांच्या शतकीय खेळीच्या जोरावर भारतीय अ संघाने लिसेस्टरशायरविरुद्ध खेळताना 50 षटकात 459 धावांचं आव्हान उभं केलं. भारतीय अ संघाकडून पृथ्वीने 90 चेंडूत 132 धावांची धमाकेदार खेळी केली, ज्यामध्ये 20 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे.

लंडन : तुफान फॉर्मात असलेला पृथ्वी शॉ आणि सिनीअर संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत असलेल्या मयंक अग्रवाल यांनी आज मैदान गाजवलं. या दोघांच्या शतकीय खेळीच्या जोरावर भारतीय अ संघाने लिसेस्टरशायरविरुद्ध खेळताना 50 षटकात 459 धावांचं आव्हान उभं केलं. भारतीय अ संघाकडून पृथ्वीने 90 चेंडूत 132 धावांची धमाकेदार खेळी केली, ज्यामध्ये 20 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. त्याने आपल्या खेळीमध्ये 98 धावा केवळ चौकार आणि षटकारांनीच जमवल्या. तर रिटायर्ड हर्ट होण्यापूर्वी मयंकने 106 चेंडूत 151 धावा केल्या, ज्यामध्ये 18 चौकार आणि पाच षटकारांचा समावेश आहे. पहिल्या सामन्यात चार धावा करुन माघारी परतणाऱ्या मयंकने या सामन्यात मात्र लिसेस्टरशायरच्या गोलंदाजांची धुलाई केली. पृथ्वीने 77 चेंडूत, तर मयंकने 85 चेंडूत शतक पूर्ण केलं. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 26 षटकात 221 धावांची भागीदारी केली. पृथ्वी बाद झाल्यानंतर अंडर-19 विश्वचषकातील भारताचा हिरो शुबमन गिल खेळण्यासाठी उतरला. त्याने मयंकची साथ देत 35 षटकांमध्येच धावसंख्या 300 च्या पुढे नेली. त्याने 41 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं, विशेष म्हणजे त्याने एकाच षटकात सलग चार षटकार ठोकले. भारतीय अ संघाने 43 व्या षटकातच 400 चा आकडा पार केला होता. मात्र या धावसंख्येवर ऋषभ पंत 13 धावांवर बाद झाला. पंत बाद झाल्यानंतर गिल 86 धावा करुन माघारी परतला. त्याने 54 चेंडूत सात चौकार आणि पाच षटकार ठोकले. अखेरच्या षटकांमध्ये दीपक हुड्डाने नाबाद 34 आणि कर्णधार श्रेयस अय्यरने 15 धावांची खेळी केली. भारतीय अ संघ वन डे तिरंगी मालिकेत इंग्लंड अ आणि वेस्ट इंडिजच्या अ संघासोबत भिडणार आहे. 22 जून ते 2 जुलै या काळात ही मालिका खेळवण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rohit Sharma : लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा हिटमॅनला फुल सपोर्ट
लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूची मन की बात
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
Rohit Sharma Retirement Ind vs Eng 3rd ODI: रोहित शर्माचे आई-वडील लंडनमध्ये दाखल, लॉर्ड्सवर खेळणार अखेरचा वनडे सामना?, गेल्या 24 तासांत काय काय घडतंय?
रोहित शर्माचे आई-वडील लंडनमध्ये दाखल, लॉर्ड्सवर खेळणार अखेरचा वनडे सामना?, गेल्या 24 तासांत काय काय घडतंय?

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget