एक्स्प्लोर

मोहम्मद शमीवरील आरोपांवर बीसीसीआयची प्रतिक्रिया

मोहम्मद शमीप्रकरणी बीसीसीआय आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सने सध्या तरी कोणतीही कारवाई केलेली नाही. पण बीसीसआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहां हिने आपल्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत हसीन जहांने शमीच्या पर्सनल चॅटचे स्क्रीनशॉटही फेसबुकवर शेअर केले आहेत. यामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची प्रतिक्रिया: या संपूर्ण प्रकरणी बीसीसीआय आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सने सध्या तरी कोणतीही कारवाई केलेली नाही. पण बीसीसआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याप्रकरणी प्रतिक्रिया देताना असं म्हटलं आहे की, 'ही त्यांची खासगी बाब आहे. त्यामुळे यामध्ये कुणीही पडता कामा नये. तसंच सध्यातरी त्याच्याविरुद्ध कोणतीही अधिकृत तक्रार करण्यात आलेली नाही. त्याच्यावर कोणतेही आरोप निश्चित करण्यात आलेले नाही. त्यामुळे ही त्यांची अंतर्गत बाब आहे. पण याप्रकरणी जर पोलीस तक्रार नोंदवण्यात आली तर आम्ही देखील आमच्या नियमानुसार कारवाई करु.' दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून प्रतिक्रिया देण्यास नकार: आयपीएलच्या 11व्या मोसमात शमी दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळणार आहे. पण आयपीएलच्या तोंडावरच हे प्रकरण समोर आल्याने शमीच्या अडचणीत वाढ होऊ शकते. पण दिल्ली डेअरडेव्हिल्सनेही सध्या तरी याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. दरम्यान, आज (बुधवार) सकाळी 11 वाजता दिल्ली डेअरडेव्हिल्सची पत्रकार परिषदही आहे. त्यामुळे यावेळी ते याबाबत काही वक्तव्य करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सने 3 कोटीमध्ये शमीला खरेदी केलं आहे. मोहम्मद शमीवरील आरोपांवर बीसीसीआयची प्रतिक्रिया अनेक तरुणींशी शमीचे अनैतिक संबंध, पत्नीचा फेसबुकवर आरोप हसीन जहांने मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून फेसबुकवर 11 खळबळजनक पोस्ट केल्या. शमीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही तिने केला आहे. मोहम्मद शमी सध्या धर्मशालामध्ये आहे. शमीच्या पत्नीने पोस्ट केलेल्या स्क्रीनशॉट्समध्ये काही महिलांचे फोटो आणि अश्लील चॅट दिसत आहेत. यापैकी कोणत्याही चॅटमध्ये शमीची ओळख पटत नाही. मात्र 'एबीपी आनंदो'च्या पत्रकार राजर्षी दत्ता गुप्ता यांनी हसीन जहांशी संपर्क साधला असता हे फेसबुक अकाऊण्ट आपलंच असल्याचं त्यांनी सांगितलं. 27 वर्षीय मोहम्मद शमीचं लग्न 2014 मध्ये झालं होतं. त्यांना आयरा ही मुलगी आहे. पोस्टमध्ये कोणाचा उल्लेख? हसीन जहांने नागपूर आणि पाकिस्तानातील काही महिलांचा उल्लेख केला आहे. फेसबुक पोस्टमध्ये संबंधित महिलांची नावं स्पष्ट दिसत आहेत. एका फोटोमध्ये तर सांबामध्ये राहणारी एक महिला शमीची गर्लफ्रेण्ड असल्याचा दावाही हसीनजहांने केला आहे. एक तरुणी 'आय मिस यू' असा मेसेज शमीला करते, त्यावर 'कम टू माय रुम' असा रिप्लाय तो करताना दिसत आहे. मोहम्मद शमीवरील आरोपांवर बीसीसीआयची प्रतिक्रिया हसीनजहांचे आरोप मोहम्मद शमी आणि त्याच्या कुटुंबीयांवर हसीन जहांने अनेक गंभीर आरोप केले आहेत. शमीने सातत्याने आपला शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचं ती सांगते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन परतल्यानंतरही त्याने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप तिने केला. शमी आणि त्याच्या कुटुंबाने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही दावा हसीन जहांने केला. 'शमी अनेक महिलांसोबत अश्लील चॅट करायचा. जेव्हा त्याचा फोन माझ्या हाती लागला, तेव्हा तो 'लॉक' होता. मात्र वेगवेगळे पॅटर्न्स वापरल्यावर अखेर फोन अनलॉक झाला. अखेर मला या गोष्टींचा उलगडा झाला. शमीचे सगळे कॉल डिटेल्स आणि स्क्रीनशॉट्स माझ्या हाती लागले. आपला फोन गायब झाल्याचं समजताच तो चांगलाच भडकला होता.' असंही हसीन जहांने 'एबीपी'शी बोलताना सांगितलं. फेसबुक वॉलवरुन या पोस्ट डीलीट कराव्यात, यासाठी आपल्यावर दबाव टाकला जात असल्याचंही हसीन जहांने सांगितलं. 8 जानेवारीला काय झालं? 'उत्तर प्रदेशमध्ये मला मारहाण केली जायची. माझं मानसिक आणि शारीरिक शोषण व्हायचं. शमीचं पूर्ण कुटुंब मला शिवीगाळ करत असे. सूर्योदयापासून रात्री दोन-तीन वाजेपर्यंत हा प्रकार चालायचा', असं तिने सांगितलं. जाधवपूर पोलिसात हिंसाचाराची माहिती दिली. 'कदाचित त्याच्या कुटुंबाने माझी हत्याही केली असती. त्यांनी माझा जीव घेण्याचा प्रयत्नही केला' असं हसीन जहां सांगते. 'मी अजूनही पोलिसात तक्रार दिलेली नाही. 8 जानेवारीला उत्तर प्रदेशमध्ये मी घरगुती हिसांचाराची बळी पडले. त्यानंतर मी कोलकात्याला गेले आणि स्थानिक पोलिसात माहिती दिली. अद्यापही कायदेशीर कारवाईबाबत मी विचार करत आहे' अशी माहिती हसीन जहांने दिली. संंबंधित बातम्या : अनेक तरुणींशी शमीचे अनैतिक संबंध, पत्नीचा फेसबुकवर आरोप

महत्त्वाच्या बातम्या

Kho Kho Association : खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस, सुनेत्रा पवारांच्या हस्ते 23 जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉपचे वाटप
खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस, सुनेत्रा पवारांच्या हस्ते 23 जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉपचे वाटप
चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
ENG vs PAK :  इंग्लंडनं पाकिस्तानचा धुव्वा उडवला, पाकचा पहिल्या कसोटीत एक डाव आणि 103 धावांनी पराभव, लीडसवर पाकचा पुन्हा पराभव
इंग्लंडकडून पाकिस्तानचा धुव्वा, पहिल्या कसोटीत 103 धावा आणि डावानं विजय, 8 वर्षानंतर पाकचा पुन्हा तसाच पराभव
WTC Final: टीम इंडियाला 8 पैकी 5 कसोटी सामन्यात विजय मिळवताच WTC फायनलचं दार उघण्याची संधी, एका गोष्टीमुळं घात होण्याची शक्यता
भारताकडे WTC फायनलमध्ये पोहोचण्याची संधी पण एका गोष्टीमुळं घात होण्याची शक्यता, जाणून घ्या

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget