नवी दिल्ली : जॉर्डनमधील ओमान येथे सुरु असलेल्या एशियन-ओसिनिया स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सने शानदार प्रदर्शन केलं आहे. भारताच्या पाच बॉक्सर्सनी या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट कन्फर्म केलं आहे. या बॉक्सर्समध्ये दोन महिला बॉक्सर्सचा समावेश आहे. सतीश कुमार, पूजा रानी, विकास कृष्ण, लवलीना बोरगोहेन आणि आशिष चौधरी अशी या पाच बॉक्सर्सची नावं आहेत.


या पाचही बॉक्सर्सना आता टोकियो येथे पार पडणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. जॉर्डनमध्ये सुरु असलेल्या एशियन-ओसिनिया स्पर्धेत क्वार्टर फायनलचा सामना जिंकून या सर्वांनी आपलं ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केलं आहे. क्वालिफायर राऊंडमध्ये पूजा रानीने 75 किलो वजनी गटात थायलंडच्या पोम्नीपा क्युटीचा 5-0 असा पराभव करत सेमीफायनल गाठली आहे. आशिष कुमारने देखील 75 किलो वजनी गटात इंडोनेशियाच्या बॉक्सरला पराभूत करत ऑलिम्पिकमध्ये आपलं स्थान निश्चित केलं.


लवलीना बोरगोहेन 69 किलो वजनी गटात उज्बेकिस्तानच्या मक्तूनाखोन मेलिवाला 5-0 ने हरवलं. विकास कृष्णने 69 किलो वजनी गटात जपानच्या सेवोनरेट्स ओकाजावाला 5-0 ने पराभूत केलं. तर सतीश कुमारने 91 किलो वजनी गटात मंगोलियाच्या ओगोनबायर दाइवी को 5-0 ने पराभूत केलं आहे. या सर्वांनी आधीच आपल्या मॅच जिंकत ऑलिम्पिक स्पर्धेत एन्ट्री मिळवली आहे. याशिवाय आज साक्षी चौधरी (57 किलो), अमित पंघाल (52 किलो), मनीष कौशिक (63 किलो), मेरीकॉम (51 किलो) आणि सिमरनजीत (60 किलो) गटातून ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवू शकतात.


इतर बातम्या


T20 World Cup | ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा उंचावला विश्वचषक; भारतीय महिला संघाचा 85 धावांनी पराभव


'फक्त उभं रहायचं असेल तर सिक्युरिटी गार्डला बोलवा'; संदीप पाटील यांनी अजिंक्य रहाणेवर टीका


Viral : जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातमध्ये, BCCI कडून एरियल व्ह्यू फोटो शेअर