नवी दिल्ली : बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया (बीसीसीआय) ने आपल्या ट्विटर हॅन्डलवरून जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमचा एरियल व्ह्यू असणारा फोटो शेअर केला आहे. या स्टेडियमचं नाव मोटेरा स्टेडियम असं असून हे स्टेडियम अहमदाबाद येथे आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, या स्टेडियमध्ये 1 लाख 10 हजार लोक बसण्याची क्षमता आहे. दरम्यान, क्रिकेट असोसिएशन (जीएस) चे वाइस प्रेसीडंट परिमल नथवाणी यांनी 2019मध्ये स्टेडियमचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. परंतु, तेव्हा या स्टेडियमचं काम सुरू होतं. त्यांना दावा केला होता की, हे स्टेडियम मेलबर्न क्रिकेट स्टेडियमपेक्षाही मोठ स्टेडियम असणार आहे.
दरम्यान, आतापर्यंतचा सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम म्हणून, मेलबर्न क्रिकेट स्टेडियम ओळखलं जात असे. ज्यामध्ये 90 हजार लोक एकत्र बसून क्रिकेटचे सामने पाहू शकत होते. बीसीसीआयकडून मोटेरा स्टेडियमचे फोटो शेअर करताना लिहिण्यात आलं आहे की, 'मोटेरा स्टेडियम अहमदाबाद, इंडिया. ज्यामध्ये 1 लाख 10 हजारपेक्षा जास्त लोकांच्या बैसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे जगातील सर्वात मोठं स्टेडियम असणार आहे.'
बीसीसीआयने स्टेडियमचे फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारीला भारतात येणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, ते याच स्टेडियमध्ये इव्हेंट अटेंड करणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी सांगितले की, 'ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यासाठी स्टेडियममध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.'
हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शहरात गस्त घालणार
ट्रम्प यांच्या दौऱ्यामुळे हेलीकॉप्टरमार्फत संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त असणार आहे. तसेच अमेरिकन स्नायपर्स, सीसीटिव्ही यांमार्फत नजर ठेवण्यात येणार आहे. एवढचं नाहीतर संपूर्ण शहरावर हेलिकॉप्टरच्या मदतीने नजर ठेवली जाणार आहे. अहमदाबादमध्ये 11 हजारपेक्षा अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पीएम मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प साबरमती नदीवर काही वेळ थांबणार असल्याचीही माहिती मिळत आहे.
दरम्यान, मोटेरा स्टेडियममध्ये 'केम छो ट्रम्प' कार्यक्रमादरम्यान 1 लाख 10 हजारहून अधिक लोक उपस्थित राहणार आहेत. स्टेडियममध्ये एक लाक लोकांच्या बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा स्टेज उभारण्यात येणार आहे. या स्टेजसमोर 14 हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
संबंधित बातम्या :
डोनाल्ड ट्रम्प भारतात येण्याआधी अमेरिकी सीक्रेट सर्व्हिसचे एजंट दाखल; दौऱ्यासाठी करणार नियोजन
'फेसबुकवर मी नंबर वन, पंतप्रधान नरेंद्र मोदी नंबर टू', भारत दौऱ्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्वीट