मुंबई : येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची मुलगी रोशनी कपूरला मुंबई विमानतळावर रोखण्यात आलं आहे. रोशनी कपूर ब्रिटीश एअरवेजमधून लंडनला जात होती. कपूर कुटुंबाविरोधात लूक आऊट नोटीस जारी केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. 36 तासाच्या मॅरेथॉन चौकशीनंतर YES बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना 8 तारखेला पहाटे 4 वाजता ईडीकडून अटक करण्यात आलं. राणा कपूर यांना ईडीने अटक केल्यानंतर आता त्यांची मुलगी रोशनी कपूर ही लंडनला जाता असताना तिला मुंबई विमानतळावर अडवण्यात आलं आहे.


रोशनी कपूर का आली अडचणीत?
YES बँकेने डीएचएफला 3700 कोटींच कर्ज दिलं. डीएचएफने 'DOIT URBAN INDIA PVT LTD' कंपनीला 600 कोटींच कर्ज दिलं. ही कंपनी राणा कपूर यांच्या दोन्ही मुली रोशनी आणि राधा यांच्या नावावर आहेत. दोघीच या कंपनीच्या 100 टक्के मालकीन आहेत.

YES BANK | घाबरण्याचं कारण नाही, तुमचे पैसे सुरक्षित; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं आश्वासन

काय आहे आरोप ?
राणा कपूर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून आणि नियम बाह्य कर्ज देऊन त्याच्या मोबदल्यात 600 कोटींचे कमिशन आपल्या मुलींच्या नावी असलेल्या कंपनीत घेतले. हा पैसे जनतेचा होता ज्याचा गैरवापर कपूर यांनी केला. या कर्जाच्या मोबदल्यात रोशनीची कंपनी जी वस्तू गहाण ठेवली त्याची किंमत फक्त 40 कोटी रुपये होती. आता 40 कोटींच्या ठेवी ठेवून 600 कोटींचे कर्ज डीएचएफने का दिले हा मोठा प्रश्न आहे.

ना पिनची, ना कार्डची गरज, येस बँक नवं एटीएम आणणार

कसा होता घटनाक्रम
6 मार्चला ईडीने राणा कपूर यांच्या घरी रात्री 10 वाजल्यापासून धाडसत्र सुरू केले होते. 7 मार्च ला दुपारी 12 वाजता राणा कपूर यांना ईडी कार्यलयात चौकशी साठी आण्यात आलं. 8 मार्च पहाटे 4 वाजता मनी लॅन्डरिंगच्या आरोपाखाली राणा कपूर यांना ईडीने अटक करत त्यांना कोर्टात हजर करण्यात केलं. जिथे कोर्टाने त्यांना 11 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

कोण आहेत राणा कपूर, त्यांच्यावर काय आहेत आरोप

एमबीए झाल्यानंतर राणा कपूर 1980 साली बँक ऑफ अमेरिकेत मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून कामाला सुरुवात केली. बँक ऑफ अमेरिकेसोबत तब्बल 16 वर्ष काम केलं. 2004 साली राणा कपूर यांनी नातेवाईक अशोक कपूर यांच्या सोबत येस बँकेची स्थापना केली. 26/11 च्या हल्ल्यात बँकेचे सहसंस्थापक अशोक कपूर यांचा मृत्यू झाला. अशोक कपूर यांच्या पत्नी आणि राणा कपूर यांच्यात भागीदारीवरुन वादाला सुरुवात झाली. राणा यांनी वैयक्तिक संबंधानुसार येस बँकेतून कर्ज देण्यास सुरुवात केली. अनिल अंबानींचा समूह, सीजी पॉवर, एस्सार पॉवरसारख्या समुहांना मोठं कर्ज दिलं. 2017 साली बँकेनं 6 हजार 355 कोटींची रक्कम बॅडलोन म्हणून घोषित केली. 2018 साली राणा कपूर यांच्यावर कर्ज आणि ताळेबंदीत गडबड केल्याचा आरबीआयनं आरोप केला. त्यानंतर रिझर्व्ह बँकेनं येस बँकेवर निर्बंध लावण्यास सुरुवात केली.