ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय हिलीने आपल्या आक्रमक फलंदाजीने योग्य असल्याचे दाखवून दिले. हिलीने यावेळी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. आतापर्यंत झालेल्या पुरुषांच्या आणि महिलांच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. हिलीने 39 चेंडूंत सात चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 75 धावा केल्या. हिली बाद झाल्यावर बेथ मुनीनेही आक्रमक फलंदाजी केली आणि त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला भारतासमोर धावांचा डोंगर उभारता आला.
डोमेस्टिक क्रिकेटचा 'सचिन' वसिम जाफरची निवृत्तीची घोषणा
या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी अतिशय खराब कामगिरी केली. भारताकडून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी सलामीवीर शफाली वर्मा ही अंतिम सामन्यात अयशस्वी ठरली. सामन्याच्या तिसऱ्याच चेंडूवर ती दोन धावा काढून बाद झाली. त्यानंतर दुखापतग्रस्त तानिया भाटीयाच्या जागी मैदानावर आलेली जेमायमा रॉड्रीग्ज शून्यावर माघारी परतली. आधीच्या षटकात दोन चौकार लगावलेली स्मृती मानधना 11 धावा करून बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौर 4 धावांवर माघारी परतली. दिप्ती शर्माने झुंज देत सर्वाधिक 33 धावा केल्या. पण इतर फलंदाजांनी साफ निराशा केली. भारताचे तब्बल 6 फलंदाज एक आकडी धावसंख्येवर बाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शूटने सर्वाधिक 4 बळी टिपले.
Thief At Saloni Alot Home | सलोनी अलोटची घरात घुसलेल्या चोरट्यावर झडप