एक्स्प्लोर

'हा' संघ वर्ल्डकप जिंकणार, सचिनची भविष्यवाणी

मे महिन्यात 2019 च्या क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. सातत्याने चांगली कामगिरी करणारे भारत, इंग्लड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे संघ वर्ल्डकपचे प्रबळ दावेदार आहेत. परंतु सचिनने 'या' संघाला पसंती दर्शवली आहे.

मुंबई : मे महिन्यात 2019 च्या क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. हा वर्ल्ड कप कोण जिंकणार याबद्दल सध्या अनेक ठिकाणी चर्चा सुरु आहेत. भारत, इंग्लड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे संघ सातत्याने चांगली कामगिरी करत असल्यामुळे या संघांमध्ये वर्ल्डकपसाठी मोठी चुरस असणार, अशी चर्चा क्रिकेट विश्वात सुरु आहे. त्याचवेळी भारताचा माजी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने 2019 चा वर्ल्डकप कोण जिंकणार याबाबत त्याचं मत मांडलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मते भारतीय संघ हाच 2019 च्या वर्ल्डकपचा प्रबळ दावेदार आहे. गेल्या दोन वर्षांमधली भारतीय संघाची कामगिरी पाहता भारतीय संघ आगामी वर्ल्डकप जिंकू शकतो, असे सचिनने म्हटले आहे. परंतु तेंडुलकरने भारतीय संघाला संभाव्य धोक्याचीही जाणीव करून दिली. जेतेपदाच्या शर्यतीत भारताला इंग्लंडच्या संघाकडून कडवे आव्हान मिळू शकते, असे तेंडुलकरने म्हटले आहे. भारताला वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या संघाकडून कडवे आव्हान मिळू शकते, त्यामुळे इंग्लंडपासून सावध राहण्याचा इशारा सचिनने दिला आहे. 2015 साली झालेल्या वर्ल्डकपनंतर भारताने सरासरी 67.09 सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडने 66.23 च्या सरासरीने सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. तसेच इंग्लंडचा संघ जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे, भारत मात्र दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे या दोन संघामध्ये मोठी चुरस असणार हे या आकडेवारीवरुन स्पष्ट होते. भारतीय संघाने रविवारी झालेल्या हॅमिल्टन वनडेमध्ये न्यूझीलंडवर विजय मिळवून पाच वन डे सामन्यांची मालिका 4-1 ने खिशात घातली. त्याअगोदर न्यूझीलंडच्या संघाचा कसोटी मालिकेतही भारताने पराभव केला. न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारताने ऑस्ट्रेलियालादेखील त्यांच्याच भूमीवर नमवले. बॉल टेम्परिंगच्या आरोपांमुळे स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. हा एक वर्षाचा कालावधी पुढील दीड महिन्यात संपणार आहे. त्यामुळे स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचे ऑस्ट्रेलियन संघात लवकरच पुनरागमन होईल. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघही जोरदार मुसंडी मारू शकतो, असा विश्वास तेंडुलकरने व्यक्त केला. स्मिथ आणि वॉर्नरमुळे संघातील जोश आणखी वाढेल आणि हा संघ जेतेपदाच्या शर्यततीतही परतेल, असा विश्वासही तेंडुलकरने व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nitish Rana Emotional DPL VIDEO : 27 चेंडूत अर्धशतक... आकाशाकडे बघताच दिवंगत आईची आठवण अन् पुढच्याच क्षणी अश्रूंचा बांध फुटला! नीतीश राणाचा काळजाला भिडणारा VIDEO
27 चेंडूत अर्धशतक... आकाशाकडे बघताच दिवंगत आईची आठवण अन् पुढच्याच क्षणी अश्रूंचा बांध फुटला! नीतीश राणाचा काळजाला भिडणारा VIDEO
IND vs SL 1st TEST : भारताविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीत श्रीलंकेच्या प्लेइंग-11मध्ये मोठा बदल, दिनेश चंडिमल OUT; 26 वर्षीय खेळाडूचा थेट डेब्यू
भारताविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीत श्रीलंकेच्या प्लेइंग-11मध्ये मोठा बदल, दिनेश चंडिमल OUT; 26 वर्षीय खेळाडूचा थेट डेब्यू
National Sports Awards : मोठी बातमी : यंदा कोणालाच खेलरत्न पुरस्कार नाही, 17 जणांना अर्जुन पुरस्कार, एकाही क्रिकेटपटूला एकही अवॉर्ड नाही, पाहा संपूर्ण यादी!
मोठी बातमी : यंदा कोणालाच खेलरत्न पुरस्कार नाही, 17 जणांना अर्जुन पुरस्कार, एकाही क्रिकेटपटूला एकही अवॉर्ड नाही, पाहा संपूर्ण यादी!
IND vs SL 1st Test DAY-4 Live : दुसऱ्या डावात टीम इंडिया 193 धावांवर ऑलआऊट! श्रीलंकेसमोर 372 धावांचं लक्ष्य; आता प्रत्येक चेंडू ठरणार निर्णायक, जाणून घ्या LIVE अपडेट्स
दुसऱ्या डावात टीम इंडिया 193 धावांवर ऑलआऊट! श्रीलंकेसमोर 372 धावांचं लक्ष्य; आता प्रत्येक चेंडू ठरणार निर्णायक, जाणून घ्या LIVE अपडेट्स

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Embed widget