एक्स्प्लोर

कसोटी क्रिकेटचं नवं पर्व !

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेटची वाढलेली लोकप्रियता लक्षात घेता कसोटी क्रिकेटलाही नवी संजीवनी देण्याचा आयसीसीचा प्रयत्न आहे. यासाठीच टेस्ट चॅम्पियनशीप हे आयसीसीनं उचललेलं महत्वाचं पाऊल मानलं जात आहे.

बर्मिंगहॅम : उद्यापासून बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांदरम्यान अॅशेस मालिकेतली पहिली कसोटी खेळवण्यात येणार आहे. पण या कसोटीला एक वेगळ महत्व असणार आहे. कारण या मालिकेपासून आयसीसीच्या टेस्ट चॅम्पियनशिपला सुरुवात होणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेटची वाढलेली लोकप्रियता लक्षात घेता कसोटी क्रिकेटलाही नवी संजीवनी देण्याचा आयसीसीचा प्रयत्न आहे. यासाठीच टेस्ट चॅम्पियनशीप हे आयसीसीनं उचललेलं महत्वाचं पाऊल मानलं जात आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांमधल्या अॅशेस मालिकेतल्या पहिल्या कसोटीपासून या विजेतेपदाच्या संग्रामाला सुरुवात होत आहे. त्यात कसोटी मान्यता असलेले बारापैकी नऊ संघ सहभागी होणार आहेत. या नऊ संघांमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे.
1 ऑगस्ट 2019 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान या सर्व संघांमध्ये एकूण 27 मालिका खेळवल्या जातील. प्रत्येक संघ सहा कसोटी मालिका खेळेल. त्यात 72 कसोटी सामन्यांचा समावेश असेल. त्यातून पहिल्या दोन संघांमध्ये विजेतेपदासाठीचा सामना 10 ते 14 जून 2021 ला लंडनच्या लॉर्डसवर खेळवण्यात येईल.
कसोटी क्रिकेटचं नवं पर्व ! Photo : Getty Images आयसीसीच्या टेस्ट चॅम्पियनशीपचं सर्व सहभागी देशांनी स्वागत केलं आहे. विंडीज दौऱ्यावर निघण्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनंही या स्पर्धेमुळे कसोटी क्रिकेटमध्ये चुरस वाढणार असल्याचं म्हटलं आहे. कसोटी क्रिकेटसाठी सत्तरच्या दशकापर्यंतचा काळ हा सुवर्णकाळ होता. पण त्यानंतर जानेवारी 1971 मध्ये वन डे क्रिकेटचा जन्म झाला आणि कसोटी क्रिकेटची लोकप्रियता ओसरु लागली. त्यानंतर सुमारे तीन दशकानंतर ट्वेन्टी-ट्वेन्टी क्रिकेटच्या रुपानं आणखी एक फॉरमॅट उदयाला आला. ज्यानं वन डे आणि कसोटी क्रिकेटपेक्षा अमाप लोकप्रियता मिळवली. या शर्यतीत कसोटी क्रिकेट कुठेतरी धडपडत होतं. त्या धडपडणाऱ्या कसोटी क्रिकेटला सावरण्यासाठीच आयसीसीनं हे महत्वाचं पाऊल उचललं आहे. असं म्हटलं जातं की 'टेस्ट क्रिकेट इस द बेस्ट क्रिकेट'. क्रिकेटच्या आजी माजी जाणकारांना विचाराल तर त्यांच्याकडूनंही हेच उत्तर मिळेल. पण आज ट्वेन्टी ट्वेन्टीच्या जमान्यात मागे पडलेल्या या टेस्ट क्रिकेटला ही टेस्ट चॅम्पियनशीप आता कशी तारणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhana: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
Video: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
Ind vs NZ T20 Series: भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती IN...; न्यूझीलंविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी जाहीर केला टीम इंडियाचा चक्रावणारा संघ
भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती IN...; न्यूझीलंविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी जाहीर केला टीम इंडियाचा चक्रावणारा संघ
IND vs WI 1st T20 : श्रेयस अय्यरचं पहिलं शतक अन् थेट वेस्ट इंडिजचा पाडला फडशा! टीम इंडियाने 32 चेंडू राखून सामना जिंकला
श्रेयस अय्यरचं पहिलं शतक अन् थेट वेस्ट इंडिजचा पाडला फडशा! टीम इंडियाने 32 चेंडू राखून सामना जिंकला

व्हिडीओ

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
Rupali Patil Thombare: हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
Embed widget