एक्स्प्लोर

सोळावं ग्रँड स्लॅम नदालचं

स्पॅनिश बुलनं आजवरच्या कारकीर्दीत पहिल्यांदा 2010 साली आणि मग 2013 साली अमेरिकन ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं. पण यंदा त्यानं तिसऱ्यांदा अमेरिकन ओपन जिंकून, आपल्या ग्रँड स्लॅम विजेतेपदांची संख्या 'स्वीट सिक्सटिन'वर नेली.

मुंबई : जागतिक क्रमवारीतला ‘नंबर वन’ राफेल नदाल नंबर वनसारखाच खेळला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनचा पराभव हा अटळ ठरला. त्यानं पराभव टाळण्यासाठी तब्बल अडीच तास संघर्ष केला खरा, पण अखेर सरशी नदालचीच झाली. राफेल नदालनं केविन अँडरसनचा 6-3, 6-3, 6-4 असा धुव्वा उडवून अमेरिकन ओपनच्या विजेतेपदावर तिसऱ्यांदा आपलं नाव कोरलं. स्पॅनिश बुलनं आजवरच्या कारकीर्दीत पहिल्यांदा 2010 साली आणि मग 2013 साली अमेरिकन ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं. पण यंदा त्यानं तिसऱ्यांदा अमेरिकन ओपन जिंकून, आपल्या ग्रँड स्लॅम विजेतेपदांची संख्या 'स्वीट सिक्सटिन'वर नेली. नदालच्या अमेरिकन ओपन विजेतेपदाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचं यंदाच्या मोसमातलं दुसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलं. त्यानं आणि रॉजर फेडररनं  मोसमातली दोन-दोन ग्रँड स्लॅम विजेतीपदं पटकावून व्यावसायिक टेनिसवरचं आपलं वर्चस्व अबाधित राखलं. नदालनं फ्रेन्च ओपन आणि अमेरिकन ओपन जिंकली, तर फेडररनं विम्बल्डन आणि ऑस्ट्रेलियन ओपन. यंदाच्या मोसमातलं हे दुहेरी ग्रँड स्लॅम यश नदालला समाधानकारक वाटतं. कारण ऑस्ट्रेलियन ओपनमध्येही त्यानं फायनलमध्ये धडक मारली होती. नदालचं विम्बल्डनमधलं आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आलं असलं तरी, त्यानं पराभव टाळण्यासाठी पाच सेट्स संघर्ष केला. नदालच्या अमेरिकन ओपनमधल्या विजेतेपदानं त्याची आणि फेडररची सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतीपदांची शर्यत आता आणखी तीव्र झाली आहे. 36 वर्षांच्या फेडररच्या खजिन्यात आजवर 19 ग्रँड स्लॅम विजेतीपदं आहेत, तर 31 वर्षांच्या नदालच्या शोकेसमध्ये आता 16 ग्रँड स्लॅम विजेतीपदं झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर नदाल म्हणतो की, सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतीपदांच्या शर्यतीत फेडररला गाठणं हे माझं मुख्य उद्दिष्ट नाहीय. फेडररशी स्पर्धा करण्याचा मी कधीच विचार केला नाही. मी माझ्या शैलीनं खेळतो. तो त्याच्या शैलीनं. त्याच्या आणि माझ्यामधला तीन ग्रँड स्लॅम विजेतीपदांचा फरक माझ्या दृष्टीनं फार मोठा नाही. पण आम्ही दोघं आणखी किती वर्ष खेळत राहतो, ही माझ्या दृष्टीनं उत्सुकता आहे. राफेल नदाल म्हणतो, त्यानुसार तो आणि फेडरर आणखी किती वर्षे खेळत राहणार ही जशी त्याची उत्सुकता आहे, तशीच ती टेनिसविश्वाचीही उत्सुकता आहे. कारण या घडीला व्यावसायिक टेनिसचं भावविश्व हे नदाल आणि फेडरर या दोन आधारस्तंभावरच उभं आहे. 2003 सालच्या विम्बल्डनपासून आजच्या अमेरिकन ओपनपर्यंत, 58 पैकी मोजून 35 ग्रँड स्लॅम विजेतेपदं ही त्या दोघांनीच वाटून घेतली आहेत. नदाल आणि फेडररची ही मक्तेदारी आणि त्या दोघांमधली निकोप स्पर्धा व्यावसायिक टेनिसला अधिकाधिक समृद्ध करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IND Vs WI 5th T20 LIVE Score Update : भारत-वेस्ट इंडिजचा सामना किती षटकांचा, किती वाजता होणार सुरु? बंगळुरुमधून मोठी अपडेट समोर, जाणून घ्या LIVE अपडेट
भारत-वेस्ट इंडिजचा सामना किती षटकांचा, किती वाजता होणार सुरु? बंगळुरुमधून मोठी अपडेट समोर, जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs WI 5th T20 : बंगळुरुमध्ये पावसाचा हाहाकार! भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना 5 षटकांचा होणार? जाणून घ्या डेडलाईन
बंगळुरुमध्ये पावसाचा हाहाकार! भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना 5 षटकांचा होणार? जाणून घ्या डेडलाईन
Mumbai Indians IPL 2027 : मुंबई इंडियन्समध्ये मोठा उलटफेर! जयवर्धनेला नारळ, आता राहुल द्रविड होणार नवा कोच? तर रोहित शर्माकडे कर्णधारपद? चक्रावून टाकणारी Inside Story
मुंबई इंडियन्समध्ये मोठा उलटफेर! जयवर्धनेला नारळ, आता राहुल द्रविड होणार नवा कोच? तर रोहित शर्माकडे कर्णधारपद? चक्रावून टाकणारी Inside Story
IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
Embed widget