एक्स्प्लोर

पहिल्या टी-20 मध्ये आयर्लंडचा धुव्वा, भारताचा 76 धावांनी विजय

आयपीएलनंतर नव्या दमाने मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने आयर्लंडच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली.

डबलिन : टीम इंडियाने आयर्लंड दौऱ्यातल्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात यजमानांचा 76 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडला विजयासाठी 209 धावांचं आव्हान दिलं होतं. पण कुलदीप यादवने चार आणि यजुवेंद्र चहलने तीन फलंदाजांना माघारी धाडून, आयर्लंडला नऊ बाद 132 धावांत रोखलं. आयर्लंडविरुद्धच्या पहिल्याच टी-20 सामन्यात भारतीय सलामीवीर जोडी रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी तुफान फटकेबाजी केली. रोहित शर्माने 97, तर शिखर धवनने 74 धावा केल्या. या खेळीच्या बळावर टीम इंडियाने पाच बाद 208 धावा करत आयर्लंडला विजयासाठी 209 धावांचं आव्हान दिलं होतं. आयपीएलनंतर नव्या दमाने मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने आयर्लंडच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. रोहित शर्माने 61 चेंडूत पाच चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने 97 धावा केल्या. मात्र अखेरच्या षटकात तो बाद झाला. शिखर धवननेही 45 चेंडू खेळत पाच चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 74 धावा ठोकल्या. सोळाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर केविन ऑब्रायनच्या चेंडूवर शिखर धवन बाद झाला. त्यानतंर आलेला सुरेश रैना केवळ दहा धावा करुन माघारी परतला. दरम्यान, 208 धावा केल्या असल्या तरी अखेरच्या षटकात भारताने झटपट विकेट गमावल्या. आयर्लंडच्या पीटर चेसने त्याच्या करिअरमधील तिसऱ्याच टी-20 सामन्यात चार विकेट घेण्याचा पराक्रम गाजवला. सुरेश रैना, महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहली अशा महत्त्वाच्या फलंदाजांना त्याने बाद केलं. भारताने पहिल्या 160 धावा 15.5 षटकांमध्ये एकही विकेट न गमावता केल्या. मात्र नंतरच्या 48 धावा करण्यासाठी भारताला पाच विकेट गमवाव्या लागल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Cabinet Decisions : क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
Dhruv Jurel Century : सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
IND vs SL 2nd TEST Day-2 : जुरेलने ठोकलं शतक, पंतने स्टेडियमचं सोलर पॅनल फोडलं, भारताचा 503 धावांचा डोंगर; दुसऱ्या दिवशी काय-काय घडलं?
जुरेलने ठोकलं शतक, पंतने स्टेडियमचं सोलर पॅनल फोडलं, भारताचा 503 धावांचा डोंगर; दुसऱ्या दिवशी काय-काय घडलं?
Dhruv Jurel Century : वा रे जुरेल! धोनीला जे जमलं नाही, ते लंकेत करून दाखवलं; ठोकले ऐतिहासिक शतक, सेलिब्रेशनने वेधलं सगळ्यांचं लक्ष
वा रे जुरेल! धोनीला जे जमलं नाही, ते लंकेत करून दाखवलं; ठोकले ऐतिहासिक शतक, सेलिब्रेशनने वेधलं सगळ्यांचं लक्ष

व्हिडीओ

Tukaram Mundhe on Loose Oil : रडारवर सुटं तेल गोरगरिबांची घालमेल Special Report
Mumbai Ganapti Hight : गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काय आहेत नियम? Special Report
Manoj Jarange Jalna : सरकारने गाळला घाम पण जरांगे ठाम Special Report
Unemployed Youth : 9 कोटी तरुणाई घरी, का वाढली बेरोजगारी? Special Report
Sanjay Raut Mumbai PC : मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी, त्यांच्या हातात सुदर्शन चक्र - संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cabinet Decisions : क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
Maharashtra Live blog updates: एनआयएची देशभरात छापेमारी, पुण्याच्या जुन्नरमध्ये मोठी कारवाई
Maharashtra Live blog updates: एनआयएची देशभरात छापेमारी, पुण्याच्या जुन्नरमध्ये मोठी कारवाई
Share Market : क्रूड तेल, जागतिक बॉण्ड यील्ड्समुळे निफ्टी 50 घसरणीसह बंद
Share Market : क्रूड तेल, जागतिक बॉण्ड यील्ड्समुळे निफ्टी 50 घसरणीसह बंद
Devendra Fadnavis warns Mahayuti Leaders: महायुतीत स्थानिक पातळीवर धुसफूस, देवेंद्र फडणवीसांचा कठोर पवित्रा, प्रमुख नेत्यांना वॉर्निंग
महायुतीत स्थानिक पातळीवर धुसफूस, देवेंद्र फडणवीसांचा कठोर पवित्रा, प्रमुख नेत्यांना वॉर्निंग
Dhruv Jurel Century : सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
सरकारी दवाखान्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न; डॉक्टर गैरहजर, गडचिरोलीत प्रसुतीवेळी आईसह बाळ दगावले
सरकारी दवाखान्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न; डॉक्टर गैरहजर, गडचिरोलीत प्रसुतीवेळी आईसह बाळ दगावले
जळगावात कावड यात्रेदरम्यान ट्रकच्या धडकेत 8 वर्षीय चिमुकला ठार; चालकाला बेदम मार, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
जळगावात कावड यात्रेदरम्यान ट्रकच्या धडकेत 8 वर्षीय चिमुकला ठार; चालकाला बेदम मार, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
Embed widget