एक्स्प्लोर

विजयरथावर आरुढ टीम इंडिया आणखी एका विजयासाठी सज्ज

पहिल्या वन डेत श्रीलंकेवर 9 विकेट्स राखून मात केल्यानंतर भारतीय संघ आता दुसऱ्या वन डेतही विजयाची मालिका कायम राखण्यासाठी उत्सुक असेल.

कॅण्डी/मुंबई : भारत आणि श्रीलंका संघांमधला दुसरा वन डे सामना उद्या (गुरुवार) कॅण्डीच्या पल्लिकल स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या मालिकेतल्या सलामीच्या सामन्यात टीम इंडियाने आपल्या ताकदीला साजेसा खेळ करून दणदणीत विजय साजरा केला होता. आता कॅण्डीच्या वन डेतही भारतीय संघ श्रीलंकेवर विजय मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. सलामीवीर शिखर धवनच्या खणखणीत शतकाने दम्बुलाच्या वन डेत टीम इंडियाने 9 विकेट्स राखून विजय मिळवला. भारत आणि श्रीलंका या दोन संघांच्या ताकदीतला फरक लक्षात घेता, दम्बुलाच्या वन डेत टीम इंडियाचा विजय अपेक्षितच होता. पण विराट कोहलीच्या फौजेने केवळ विजय साजरा केला नाही, तर उपुल थरंगाच्या फौजेचा अक्षरश: फडशा पाडला. बलाढ्य टीम इंडियाने या सामन्यात श्रीलंकेचा तब्बल नऊ विकेट्सनी धुव्वा उडवला. या एकतर्फी लढाईच्या पार्श्वभूमीवर भारत आणि श्रीलंका संघ कॅण्डीच्या रणांगणात पुन्हा आमनेसामने येत आहेत. उभय संघांमधला दुसरा वन डे सामना हा कॅण्डीच्या पल्लिकल स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाच्या 2019 सालच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात म्हणून श्रीलंका दौऱ्यातल्या वन डे सामन्यांच्या मालिकेकडे पाहिलं जातं. त्यामुळेच सलामीच्या वन डेत अक्षर पटेल, केदार जाधव आणि यजुवेंद्र चहल या भारताच्या बदली फिरकी गोलंदाजांनी बजावलेली कामगिरी बीसीसीआयची निवड समिती आणि भारतीय संघव्यवस्थापनाची अपेक्षा उंचावणारी ठरली आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने या मालिकेसाठी मोहम्मद शमी, उमेश यादव, रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा या चार प्रमुख गोलंदाजांना विश्रांती दिली आहे. दम्बुलाच्या वन डेत भारताच्या बदली फिरकी गोलंदाजांनी श्रीलंकेचा अवघ्या 216 धावांत खुर्दा उडवून, टीम इंडियाला महारथी गोलंदाजांची उणीव भासू दिली नाही. सलामीच्या निरोशन डिकवेलाने धनुष्का गुणतिलका आणि कुशल मेंडिसच्या साथीने श्रीलंकेला 25व्या षटकातच दोन बाद 139 अशी भक्कम स्थितीत मजल मारून दिली होती. त्या वेळी श्रीलंका भारताने दिलेल्या आव्हानाच सहज पाठलाग करेन असं वाटत होतं. पण अक्षर पटेल, केदार जाधव आणि यजुवेंद्र चहलच्या फिरकीने या सामन्याला कलाटणी दिली. अक्षर पटेल, केदार जाधव आणि यजुवेंद्र चहल या फिरकी त्रिकुटाइतकंच शिखर धवनचं नाबाद शतक आणि त्यानं विराट कोहलीच्या साथीने रचलेली 197 धावांची अभेद्य भागीदारी टीम इंडियाची प्रचंड ताकद दाखवून देणारी ठरली. रोहित शर्माचं धावचीत होणं हीच एक बाब भारतीय संघाच्या दम्बुला वन डेवरच्या निर्विवाद वर्चस्वाला गालबोट ठरली. कॅण्डीच्या दुसऱ्या वन डेत एकटा रोहित शर्माच नाही, तर संपूर्ण भारतीय संघाने छोट्या-छोट्या चुका टाळण्याची गरज आहे. श्रीलंकेतल्या वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी रोहित शर्मावर भारताच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे यापुढच्या काळात रोहितने आपली विकेट स्वस्त होऊ न देता धावांच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेणं अपेक्षित आहे. त्याची सुरुवात कॅण्डीत झाली, तर टीम इंडियाचा आणखी एक विजय सोपा होईल.

महत्त्वाच्या बातम्या

कसोटी क्रिकेटच्या गुणतालिकेत मोठी उलथापालथ! दक्षिण आफ्रिकेने पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, पहिल्या स्थान गमावलं 
कसोटी क्रिकेटच्या गुणतालिकेत मोठी उलथापालथ! दक्षिण आफ्रिकेने पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, पहिल्या स्थान गमावलं 
India vs UAE : मोठी बातमी, सलग दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, गोलंदाजांची पुन्हा धुलाई, यूएईचा भारतावर 6 विकेटनं दणदणीत विजय 
टीम इंडियाचा पुन्हा लाजिरवाणा पराभव, यूएईनं 26 बॉलमध्ये मॅच संपवली, भारतावर 6 विकेटनं दणदणीत विजय
Team India : न्यूझीलंडकडून चौथ्या टी 20 मध्ये भारताच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई, बीसीसीआयचा मोठा निर्णय, युवा गोलंदाजावर वनडेसाठी मोठी जबाबदारी  
चौथ्या टी 20 मध्ये भारताच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई, बीसीसीआयचा मोठा निर्णय, युवा गोलंदाजावर वनडेसाठी मोठी जबाबदारी
Yuvraj Singh: अभिषेक-वैभव-ईशानला न्याय मिळेना,  त्यांना वनडेत स्थान मिळावं,  युवराज सिंग नेमकं काय म्हणाला?
अभिषेक-वैभव-ईशानला न्याय मिळेना,  त्यांना वनडेत स्थान मिळावं,  युवराज सिंग नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Azam Khan: आजम खान जेलमधून बाहेर येताच EDकडून अटक; जेलच्या दारात अटकेसाठी ED पॅरामिलिटरी फौजा घेऊन पोहोचली
आजम खान जेलमधून बाहेर येताच EDकडून अटक; जेलच्या दारात अटकेसाठी ED पॅरामिलिटरी फौजा घेऊन पोहोचली
Raj Thackeray: पहिली भेट, गँगवार ते शिव्यांची मुलाखत, बाळासाहेबांची आठवण; राज ठाकरेंचं भाषण, संजय राऊत गहिवरले, Video
Video: पहिली भेट, गँगवार ते शिव्यांची मुलाखत, बाळासाहेबांची आठवण; राज ठाकरेंचं भाषण, संजय राऊत गहिवरले
जळगावमध्ये भारदिवसा स्टेट बॅंकेवर दरोडा, तब्बल 30 कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास, गावकऱ्यांसह पोलिसांची मोठी कामगिरी, आरोपींना सिनेस्टाईलने पकडले 
जळगावमध्ये भारदिवसा स्टेट बॅंकेवर दरोडा, तब्बल 30 कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास, गावकऱ्यांसह पोलिसांची मोठी कामगिरी, आरोपींना सिनेस्टाईलने पकडले 
Sanjay Raut: संजय राऊत आध्यात्मिक असू शकत नाही का? दररोज 10 वाजता ते कीर्तन करत असतात; बोध कीर्तन प्रकाशन सोहळ्यात राऊतांची फटकेबाजी
संजय राऊत आध्यात्मिक असू शकत नाही का? दररोज 10 वाजता ते कीर्तन करत असतात; बोध कीर्तन प्रकाशन सोहळ्यात राऊतांची फटकेबाजी
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, गर्भपात, जीवे मारण्याची धमकी; दापोलीत 50 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, गर्भपात, जीवे मारण्याची धमकी; दापोलीत 50 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा
Israel Election: इस्रायलमध्ये कोणाकडेही बहुमत नाही, थेट पंतप्रधान निवडणुकीचा विचार; विरोधी पक्षांकडून नेतान्याहूंना हटवण्यासाठी चाचपणी
इस्रायलमध्ये कोणाकडेही बहुमत नाही, थेट पंतप्रधान निवडणुकीचा विचार; विरोधी पक्षांकडून नेतान्याहूंना हटवण्यासाठी चाचपणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2026 | शनिवार
राज्यात बार्शीची सरशी.. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 5000 जमा, मेसेजही आला; दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्तांना अग्रीम मदत
राज्यात बार्शीची सरशी.. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 5000 जमा, मेसेजही आला; दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्तांना अग्रीम मदत
Embed widget