Bharti Singh : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री,  ‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंह (Bharti Singh) आणि हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) नुकतेच आई-बाबा झाले असून सध्या ते त्यांच्या लाडक्या लेकासोबत म्हणजेच 'लक्ष्य' सोबत वेळ घालवत आहेत. मुलाबाबतचे सर्व अपडेट्स ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. आता भारती आणि हर्षने लेकाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 


भारती सिंहचे स्वत:चे यूट्यूब चॅनल आहे. यावर ती अनेक व्हिडीओ शेअर करत असते. आता एक खास व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत तिने लाडक्या लेकाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. भारती सिंह तिच्या मुलाला प्रेमाने गोला म्हणते. त्यामुळे तिने 'गोलाची झलक पाहा' असे म्हणत यूट्यूबवर व्हिडीओ शेअर केला आहे. 


गोंडस गोला सोशल मीडियावर चर्चेत


गोलाची झलक दाखवतानाच भारतीने गोलाशी संबंधित अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. यात गोलाची खोली, बेड, खेळणी अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. भारती सिंहने शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल होत असून चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. व्हिडीओमध्ये गोला खूपच गोंडस दिसत आहे. 


भारती सिंहने 3 एप्रिल रोजी मुलाला जन्म दिला आहे. छोट्या पाहुण्याच्या आगमनाने भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया खूश झाले आहेत. भारती सिंह गेले अनेक दिवस तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत होती. भारतीने यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ शेअर करत गरोदरपणाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. भारती सिंहने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिला लाडका लेक दिसत असल्याने चाहते खूप खुश झाले आहेत. तिच्या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाले आहेत. चाहतेच नाही तर, मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटीदेखील भारती सिंहने शेअर केलेल्या व्हिडीओवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. 



संबंधित बातम्या


Bharti Singh : कॉमेडी क्वीन भारती सिंहने दिली गोड बातमी, छोट्या पाहुण्याचे झाले आगमन


Bharti Singh Baby Name : गोला नाही तर लक्ष्य, मुलाच्या नावाचा भारती सिंहने केला खुलासा