एक्स्प्लोर
Advertisement
विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, पाहा कोणकोणत्या क्रिकेटपटूंची निवड
इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक 2019 साठी क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे
मुंबई : इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक 2019 साठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात 15 सदस्यीय टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. बॅकअप विकेटकीपरच्या शर्यतीत दिनेश कार्तिकने रिषभ पंतला मागे टाकत संघात जागा मिळवली आहे. रिषभ पंतची 15 सदस्यी टीम इंडियामध्ये निवड झालेली नाही.
एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय निवड समितीने आज मुंबईतील पत्रकार परिषदेत विश्वचषकासाठी भारताच्या संघाची घोषणा केली. आयसीसीने खेळाडूंची निवड करण्यासाठी सर्व देशांच्या क्रिकेट बोर्डांना 23 एप्रिलपर्यंतची मुदत दिली होती.
क्रिकेट विश्वचषकाला 30 मेपासून सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. तर 16 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगेल.
विश्वचषकासाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के एल राहुल, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, विजय शंकर, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी यांचा समावेश संघात करण्यात आला आहे.
VIDEO | पाकिस्तानला क्रिकेटच्याही मैदानात पराभूत करा : सचिन तेंडुलकर विश्वचषकासाठी संघ आणि त्यासंबंधित प्रश्नांची उत्तरं कर्णधार: अनेक महिन्यांपासून भारतीय संघाचं यशस्वी नेतृत्त्व करणारा विराट कोहली विश्वचषकात नेतृत्त्व करणार आहे. उपकर्णधार: तर रोहित शर्मा उपकर्णधाराची जबाबदारी पार पाडेल. रोहित शर्मानेही त्याच्या नेतृत्त्वात टीम इंडियासाठी महत्त्वाच्या स्पर्धा जिंकून नेतृत्त्व गुण सिद्ध केलं आहे. यष्टीरक्षक: विकेटकीपर महेंद्रसिंह धोनीबाबत कोणतीही शंका नाही. पण टीम इंडियामध्ये दुसऱ्या विकेटकीपरबाबत सुरु असलेला वाद संपला आहे. बॅकअप विकेटकीपर म्हणून दिनेश कार्तिकला संघात स्थान दिलं आहे. दिनेश चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करुन टीम इंडियाच्या अडचणी दूर करु शकतो. शिवाय गरज असल्यास जलद फलंदाजीही करु शकतो. एकीकडे दिनेश कार्तिकची कामगिरी मागील दीड वर्षात चांगली आहे. यामुळेच रिषभ पंतऐवजी त्याला संधी देण्यात आली आहे. मधली फळी: टीम इंडियाच्या मधल्या फळीत विराट कोहली, एमएस धोनीसह केदार जाधव, विजय शंकर संघात महत्त्वाची भूमिका बजावतील. विजय शंकरची मागील काही महिन्यांमधील कामगिरी उत्तम आहे. भारताकडे काय आहे? जगातील सर्वोत्कृष्ट तीन क्रिकेटपटू जगातील सर्वोत्कृष्ट जलदगती गोलंदाज दोन उत्कृष्ट जलदगती गोलंदाज जगातील दोन उत्तम फिरकीपटू अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज भारताकडे काय नाही? मधळ्या फळीतला डावखुरा फलंदाज डावखुरा जलदगती गोलंदाज प्रस्थापित मधली फळी दहा षटकं टाकू शकेल असा अष्टपैलू जो दोन प्रमुख गोलंदाजांना साथ देईलIndia’s squad for the ICC #CWC19 announced: Virat Kohli (Capt), Rohit Sharma (vc), Shikhar Dhawan, KL Rahul, Vijay Shankar, MSD (wk), Kedar Jadhav, Dinesh Karthik, Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav, Bhuvneshwar Kumar, Jasprit Bumrah, Hardik Pandya, Ravindra Jadeja, Mohd Shami
— BCCI (@BCCI) April 15, 2019
संबंधित बातम्या
World Cup 2019 साठी टीम इंडिया जाहीर : भारताकडे काय आहे, काय नाही?
VIDEO | विश्वचषक सामन्यावर बहिष्कार घालून पाकला विजयाचे आयते गुण का द्यायचे? : सचिन तेंडुलकरअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement