Team India returned to Mumbai : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊनच्या (Cape Town) मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया (Team India) भारतात परतलीये. यावेळी कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हटके लूकने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. दक्षिण आफ्रिकेत जाऊन कसोटी मालिका (Test Series) ड्रॉ करु शकणारा रोहित शर्मा दुसरा भारतीय कर्णधार आहे. रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेला 7 विकेट्सने मात दिली.
रोहितच्या हटके लूकने वेधलं लक्ष
केपटाऊनच्या (Cape Town) मैदानावर टीम इंडियाला आजवर एकाही कसोटी सामन्यात विजय मिळवता आला नव्हता. मात्र, रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाना हा कारनामा करुन दाखवलाय. दरम्यान टीम इंडिया विमानतळावर पोहोचल्यानंतर रोहितच्या (Rohit Sharma) हटके लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. यावेळी त्याने कॅप देखील घातली आहे.
सोशल मीडियावर कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. रोहत मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर सर्वांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. व्हिडिओमध्ये रोहितसमवेत त्याचे चाहते फोटो काढताना दिसत आहेत. फोटो काढल्यानंतर रोहितचा वेगळा स्वॅग पाहायला मिळाला. द. आफ्रिकेला पराभूत केल्याचे समाधान रोहितच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे.
द. आफ्रिकेत जाऊन मालिकेत बरोबरी करणारा रोहित दुसरा कर्णधार
दक्षिण आफ्रिकेत जाऊन कसोटी मालिका ड्रॉ करु शकणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) दुसरा भारतीय कर्णधार आहे. रोहितच्या अगोदर हा कारनामा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने केला होता. 2010 मध्ये त्याला आफ्रिकेत जाऊन मालिकेत बरोबरी करण्यात त्याला यश आले होते. मालिकेतील पहिल्या सामन्यात द. आफ्रिकेने टीम इंडियाला 32 धावांनी पराभूत केले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दिमाखदार विजय मिळवत मालिकेत बरोबरी केली आहे.
आजवरच्या इतिहासात सर्वात कमी चेंडूमध्ये कसोटी निकाली
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधील ही कसोटी केवळ 642 चेंडूमध्ये निकाली ठरली. त्यामुळे आजवरच्या इतिहासात ती सर्वात कमी चेंडूमध्ये निकाली ठरलेली कसोटी ठरली. 1932 साली ऑस्ट्रेलियाने मेलबर्न कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि 72 धावांनी धुव्वा उडवला होता. त्यावेळी ती कसोटी केवळ 656 चेंडूमध्ये निकाली ठरली होती.
इतर महत्वाच्या बातम्या