David Warner Record In International : डेव्हिड वॉर्नरने (David Warner) आज आपल्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी पाकिस्तानविरुद्ध सिडनीच्या सिडनी क्रिकेट मैदानावर खेळली. वॉर्नर हा क्रिकेट जगतातील महान सलामीवीरांपैकी एक आहे. सलामीला फलंदाजी करताना त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. सलामीला शतक ठोकण्याच्या बाबतीत भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरही डेव्हिड वॉर्नरच्या मागे आहे.
सचिन तेंडुलकर हा क्रिकेट जगतातील महान सलामीवीरांपैकी एक आहे. याशिवाय सध्याचा भारतीय कर्णधार रोहित शर्माचाही या यादीत समावेश आहे, पण तोही ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या खूप मागे आहे. कसोटीशिवाय वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आहे. सलामीवीर म्हणून खेळताना वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 451 डावांमध्ये 49 शतके झळकावली आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे, ज्याने 342 डावांमध्ये 45 शतके झळकावली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके ठोकण्याचा पराक्रम करणारा सचिन आहे.
या यादीत आघाडीवर, वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज ख्रिस गेल 42 शतकांसह तिसऱ्या, श्रीलंकेचा माजी दिग्गज सनथ जयसूर्या 41 शतकांसह चौथ्या, भारताचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडन प्रत्येकी 40 शतकांसह संयुक्तपणे पाचव्या स्थानावर आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके करणारा फलंदाज
डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) – 49 शतके – 451 डावात
सचिन तेंडुलकर (भारत) – 45 शतके – 342 डावात
ख्रिस गेल (वेस्ट इंडीज) - 42 शतके - 506 डावात
सनथ जयसूर्या (श्रीलंका) – 41 शतके – 563 डावात
रोहित शर्मा (भारत) – 40 शतके – 331 डावात
मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया) – 40 शतके – 340 डावात
वॉर्नरची आतापर्यंतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
डेव्हिड वॉर्नरने आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये 112 कसोटी, 161 एकदिवसीय आणि 99 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीच्या 205 डावात 8786 धावा, एकदिवसीय सामन्याच्या 159 डावात 6932 धावा आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या 99 डावात 2894 धावा केल्या.
इतर महत्वाच्या बातम्या