वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूंना संधी
येत्या 3 ऑगस्टपासून भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहेत. विडींज दौऱ्यात टीम इंडिया 3 टी-20 सामने, 3 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे.
मुंबई : आगामी वेस्ट इंडिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची आज घोषणा झाली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाच टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. टी-20, एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांसाठी खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
येत्या 3 ऑगस्टपासून भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. विडींज दौऱ्यात टीम इंडिया तीन टी-20 सामने, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.
निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी विराट कोहलीसोबत टीम इंडियाची घोषणा केली. महेंद्रसिंह धोनीने या दौऱ्यातून माघार घेतली आहे. तर जसप्रीत बुमराहला या दौऱ्यात विश्रांती देण्यात आली आहे. विश्वचषकातील खराब कामगिरीमुळे दिनेश कार्तिक आणि केदार जाधव यांना संघातून वगळण्यात आलं आहे.
विश्वचषकादरम्यान दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या शिखर धवनचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच कसोटी संघामध्ये यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने देखील पुनरागमन केलं आहे.
एकदिवसीय संघ विराट कोहली (कप्तान), रोहित शर्मा (उपकप्तान) , शिखर धवन, के एल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खालील अहमद, नवदीप सैनी
India’s squad for 3 ODIs: Virat Kohli (Captain), Rohit Sharma (VC), Shikhar Dhawan, KL Rahul, Shreyas Iyer, Manish Pandey, Rishabh Pant (wk), Ravindra Jadeja, Kuldeep Yadav, Yuzvendra Chahal, Kedar Jadhav, Mohammed Shami, Bhuvneshwar Kumar, Khaleel Ahmed, Navdeep Saini
— BCCI (@BCCI) July 21, 2019
कसोटी संघ विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अगरवाल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (विकेटकीपर), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रित बुमरा, उमेश यादव
India’s squad for 2 Tests: Virat Kohli (Captain), Ajinkya Rahane (VC), Mayank Agarwal, KL Rahul, C Pujara, Hanuma Vihari, Rohit Sharma, Rishabh Pant (WK) Wriddhiman Saha (WK), R Ashwin, Ravindra Jadeja, Kuldeep Yadav, Ishant Sharma, Mohammed Shami, Jasprit Bumrah, Umesh Yadav
— BCCI (@BCCI) July 21, 2019
टी- 20 संघ विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), कृणाल पंड्या, रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर , नवदीप सैनी
India’s squad for 3 T20Is: Virat Kohli (Captain), Rohit Sharma (VC), Shikhar Dhawan, KL Rahul, Shreyas Iyer, Manish Pandey, Rishabh Pant (WK), Krunal Pandya, Ravindra Jadeja, Washington Sundar, Rahul Chahar, Bhuvneshwar Kumar, Khaleel Ahmed, Deepak Chahar, Navdeep Saini
— BCCI (@BCCI) July 21, 2019