एक्स्प्लोर
टीम इंडियाचं मानधन वाढण्याचे संकेत, विराटला आता 10 कोटी?
सध्या क्रिकेटपटूंसाठी असलेल्या 180 कोटींच्या निधीमध्ये आणखी 200 कोटींची वाढ करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंच्या मानधनात लवकरच घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी मोसमात अव्वल खेळाडू आणि देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचं मानधन दुप्पट होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीकडून यासाठी एक फॉर्म्युला तयार करण्यात येत आहे. त्यानुसार सध्या क्रिकेटपटूंसाठी असलेल्या 180 कोटींच्या निधीमध्ये आणखी 200 कोटींची वाढ करण्यात येणार आहे.
आता विराट कोहलीचं खेळाडूंच्या पगारावर बोट
काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी खेळाडूंच्या वेतनवाढीची मागणी केली होती. टीम इंडियाच्या अ श्रेणीतील खेळाडूंना जवळपास वार्षिक 20 कोटी रुपये मानधन मिळतं. 2017 या वर्षात विराटला 46 सामन्यांसाठी सुमारे साडेपाच कोटी मानधन मिळालं होतं. मात्र नव्या बदलानंतर विराटला वर्षाला 10 कोटींहून अधिक मानधन मिळणार आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement