एक्स्प्लोर
Advertisement
3 तासात खेळ खल्लास, भारताचा दारुण पराभव!
पुणे : पुणे कसोटीत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा दारुण पराभव केला. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने तब्बल 333 धावांनी विजय मिळवत, तिसऱ्या दिवशीच खेळ खल्लास केला.
जगातील सर्वोत्तम फलंदाजांचा संघ अशी ओळख असलेली विराट कोहलीची टीम इंडिया अवघ्या तीन तासात ढेपाळली. भारताचा दुसरा डाव अवघ्या 107 धावांत गुंडाळून, ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
या कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी 441 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना, पहिल्या डावाप्रमाणेच टीम इंडियाने पुन्हा एकदा नांगी टाकली.
स्टीव्ह ओ'कीफनं ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा हिरो ठरला. एकट्या ओकिफीने भारताच्या पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावातही 6 अशा 12 विकेट घेतल्या.
विराट कोहली आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या कचखाऊ फलंदाजीमुळंच भारतावर पहिल्या कसोटीत लाजिरवाण्या पराभवाची वेळ आली.
भारताचा सलामीवीर मुरली विजय 2, लोकेश राहुल 10, विराट कोहली 13, अजिंक्य रहाणे 18 ,रवीचंद्रन अश्विन 8, सहा 5, जाडेजा 3, अशी माघारी परतणाऱ्यांची रांग लागली. नाही म्हणायला चेतेश्वर पुजाराने 31 धावा करत एक बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने अजिबात साथ मिळाली नाही.
ऑस्ट्रेलियाची मोठी आघाडी
या कसोटीत ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 155 धावांची आघाडी घेतली होती. मग आज तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथनं शतक साजरं करुन ही आघाडी वाढवली. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 285 धावांवर आोटपल्यामुळे, भारताला विजयासाठी 441 धावांचं आव्हान होतं.
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव आटोपला, भारतासमोर 441 धावांचं लक्ष्य
ऑस्ट्रेलियाने आज 4 बाद 143 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. रवींद्र जाडेजाने मिचल मार्शला (31) बाद करुन पाचवा, तर उमेश यादवने मॅथ्यू वेडला तंबूत पाठवत ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का दिला. मात्र दुसरीकडे कर्णधार स्टीव्ह स्मिथ खिंड लढवत होता. स्मिथने आधी रेन शॉ आणि मग मार्शच्या साथीने शतकाकडे वाटचाल केली. स्मिथने 187 चेंडूत खणखणीत शतक झळकावलं. तो 109 धावा करुन माघारी परतला. स्मिथचं हे कसोटीतील 18 वं तर भारताविरुद्धचं पाचवं शतक आहे. तर कर्णधारपदी विराजमान झाल्यापासून हे त्याचं दहावं शतक आहे. शतकानंतर स्मिथने हात खोलून फटकेबाजीला सुरुवात केली. मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात तो तंबूत परतला. स्मिथला जाडेजाने पायचित केलं. यानंतर मग मिचेल स्टार्कला (30) अश्विनने, नॅथन लायनला (13) उमेश यादवने तर ओकिफी (6) जाडेजाने माघारी धाडत ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला. ऑस्ट्रेलियाचं हे भलं मोठं लक्ष्य दोन दिवसात पेलण्याचं आव्हान टीम इंडियासमोर होतं. मात्र भारतीय संघ आज तिसऱ्या दिवशीच ढेपाळला. संबंधित बातम्याIndvsAus - भारत पराभवाच्या छायेत
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव आटोपला, भारतासमोर 441 धावांचं लक्ष्य
पुण्यात टीम इंडिया गडगडली, कांगारुंकडे 298 धावांची भक्कम आघाडी
#IndvsAus - भारताचा पहिला डाव 105 धावात गुंडाळला भारत वि. ऑस्ट्रेलिया : पुण्यात चुरशीची लढतअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement