एक्स्प्लोर

World Cup 2019 । यजमान इंग्लंडकडून टीम इंडियाचा 31 धावांनी पराभव, रोहित शर्माचे शतक व्यर्थ

यानंतर हार्दिक पटेलने धोनीच्या साथीने वाढलेल्या धावांचे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र फटकेबाजी करण्याच्या नादात तो (45) बाद झाला. धोनीने (42) तर केदार जाधवने () धावा केल्या. इंग्लंडकडून लीम प्लंकेटने तीन तर क्रिस वोक्सने दोन विकेट्स घेतल्या.

बर्मिंगहॅम : विश्वचषकाच्या साखळी सामन्यात यजमान इंग्लंडने टीम इंडियाचा 31 धावांनी पराभव केला. या विश्वचषकातला टीम इंडियाचा हा पहिलाच पराभव  ठरला. रोहित शर्माचे शतक आणि विराट कोहलीचे अर्धशतक तसेच हार्दिक पांड्याची जिगरबाज खेळी या पराभवामुळे व्यर्थ ठरली. इंग्लंडने दिलेल्या 338 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर लोकेश राहुल भोपळाही न फोडता बाद झाला. यानंतर रोहित शर्माने कर्णधार विराट कोहलीसोबत शतकी भागीदारी करत संघाला सावरले. विराट कोहली (66) धावा करून बाद झाला. यानंतर सुरुवातीला धीम्या गतीने खेळत असलेल्या रोहित शर्माने वेगाने धावा करत आपले वर्ल्डकपमधील  तिसरे शतक साजरे केले. शतक झळकावल्यानंतर रोहित 102 धावांवर बाद झाला.  विजय शंकरच्या जागी संघात स्थान मिळालेल्या रिषभ पंतने (32) धावांची खेळी केली. यानंतर हार्दिक पंड्याने धोनीच्या साथीने वाढलेल्या धावांचे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र फटकेबाजी करण्याच्या नादात तो (45) बाद झाला. धोनीने (42) तर केदार जाधवने (12) धावा केल्या. इंग्लंडकडून लीम प्लंकेटने तीन तर क्रिस वोक्सने दोन विकेट्स घेतल्या. तत्पूर्वी जॉनी बेअरस्टोचे शतक आणि बेन स्टोक्स, जेसन रॉयच्या अर्धशतकांच्या बळावर यजमान इंग्लंडने सात बाद 337 धावांपर्यंत मजल मारली होती. जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉयने  160 धावांची शतकी सलामी देत इंग्लंडच्या धावसंख्येचा पाया मजबूत केला होता.  जेसन रॉय 57 चेंडूंत 66 धावा करुन बाद झाला होता. मग बेअरस्टोनं ज्यो रूटच्या साथीनं इंग्लंडच्या डावाला गती देत त्यानं वन डे कारकीर्दीतलं आपलं आठवं शतक साजरं केलं. त्यानं 90 चेंडूत आठ चौकार आणि सहा षटकार ठोकून शतकाला गवसणी घातली. तर 109 चेंडूत 111 धावांची खेळी केली. बेन स्टोक्सने जो रुटच्या साथीने अर्धशतकी भागीदारी रचत संघाचा डाव पुन्हा एकदा सावरला. शमीनेच रुटचा अडथळा दूर करत भारताला आणखी एक यश मिळवून दिलं.  दुसऱ्या बाजूने स्टोक्सने फटकेबाजी सुरु ठेवत इंग्लंडला 300 धावांचा टप्पा ओलांडून दिला.  भारताकडून मोहम्मद शमीने पाच विकेट्स घेतल्या.  कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 1-1 विकेट घेऊन त्याला चांगली साथ दिली होती. या विजयानंतर  इंग्लंडच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम राहिल्या आहेत. मात्र दुसरीकडे भारताच्या विजयासाठी प्रार्थना करणाऱ्या पाकिस्तानचा प्रवास मात्र आता खडतर झाला आहे. भारताच्या पराभवामुळे पाकिस्तानच्या गोटात चिंतेच वातावरण पसरलं आहे. उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी पाकिस्तानला बांगलादेशविरुद्ध विजयासोबत इतर संघाच्या कामगिरीवरही अवलंबून रहावं लागणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Final Prediction : बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
Vinesh Phogat: व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
Rishabh Pant : रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद सोडलं, LSG चा कॅप्टन कोण होणार? टीम इंडियाच्या माजी खेळाडूनं तीन नावं सुचवली
रिषभ पंतनं आयपीएल संपण्यापूर्वी लखनौचं कर्णधार पद सोडलं, नवा कर्णधार कोण? भारताच्या माजी खेळाडूनं तीन नावं सुचवली
T20 Mumbai League : ‘आमच्या टीममध्येही वैभव सूर्यवंशी!’; जेतेपद राखण्यासाठी ‘मराठा रॉयल्स’ सज्ज, कॅप्टन सिद्धेश लाड काय म्हणाला?
‘आमच्या टीममध्येही वैभव सूर्यवंशी!’; जेतेपद राखण्यासाठी ‘मराठा रॉयल्स’ सज्ज, कॅप्टन सिद्धेश लाड काय म्हणाला?

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Metro : ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
IPL 2026 Final Prediction : बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
Mamata Banerjee: 'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल

Embed widget