एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

सिद्धार्थ कौलला संधी, तीन मालिकांसाठी भारतीय संघ जाहीर

अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीचं नेतृत्त्व अजिंक्य रहाणे करणार आहे. तर विराट कोहलीच्या अनुपस्थितीत करुण नायरचंही भारतीय कसोटी संघात पुनरागमन झालं आहे.

नवी दिल्ली : टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्धचा एकमेव कसोटी सामना, इंग्लंड दौरा आणि आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-20 सामन्यांसाठी घोषणा करण्यात आली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीचं नेतृत्त्व अजिंक्य रहाणे करणार आहे. तर विराट कोहलीच्या अनुपस्थितीत करुण नायरचंही भारतीय कसोटी संघात पुनरागमन झालं आहे. दरम्यान, आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून आपल्या वेगवान गोलंदाजीने फलंदाजांना जेरीस आणणाऱ्या सिद्धार्थ कौलचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी त्याची निवड झाली आहे. एकीकडे अजिंक्य रहाणेवर अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे त्याचा इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यात समावेश करण्यात आलेला नाही. अंबाती रायडू आणि श्रेयस अय्यरला इंग्लंड विरुद्धच्या वन डे मालिकेत संधी देण्यात आली आहे. यंदाच्या आयपीएलने सिद्धार्थ कौल हा नवा खेळाडू भारतीय संघाला दिला आहे. तर किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणारा करुण नायरही पुन्हा एकदा भारतीय संघात कमबॅक करणार आहे. इंग्लंडविरुद्ध तीन टी-20 सामने विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, सिद्धार्थ कौल, उमेश यादव इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची वन डे मालिका विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, अंबाती रायडू, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, सिद्धार्थ कौल, उमेश यादव आयर्लंडविरुद्ध दोन टी-20 सामने विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, सिद्धार्थ कौल, उमेश यादव अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना अजिंक्य रहाणे (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, करुण नायर, रिद्धीमान साहा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या, इशांत शर्मा, शार्दूल ठाकूर इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक 3 जुलैपासून भारतीय संघाचा इंग्लंड दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन टी-20 सामने आणि तीन वन डे सामने खेळणार आहे. टी-20 सामने पहिला टी-20 सामना : 3 जुलै दुसरा टी-20 सामना : 6 जुलै तिसरा टी-20 सामना : 8 जुलै वन डे सामने पहिला वन डे सामना : 12 जुलै दुसरा वन डे सामना : 14 जुलै तिसरा वन डे सामना : 17 जुलै दरम्यान, इंग्लंडविरुद्ध 1 ऑगस्टपासून पाच सामन्यांची कसोटी मालिकाही खेळवण्यात येणार आहे. मात्र या मालिकेसाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. आयर्लंड दौऱ्याचं वेळापत्रक भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध दोन टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. आयर्लंडमध्ये पहिला सामना 27 जून आणि दुसरा सामना 29 जून रोजी होईल. अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना अफगाणिस्तानचा संघ कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणासाठी सज्ज आहे. अफगाणिस्तानचा पहिला कसोटी सामना भारताविरुद्ध होणार आहे. उभय संघांमध्ये हा सामना बंगळुरुत 14 ते 18 जून या काळात खेळवला जाईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर मी... मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 
अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर मी... मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 
नोकरीसाठी कबड्डीतही बोगस खेळाडूंचा सुळसुळाट; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गडांतर; चौकशीही मागणी
नोकरीसाठी कबड्डीतही बोगस खेळाडूंचा सुळसुळाट; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गडांतर; चौकशीही मागणी
Mohammed Siraj On RCB : आरसीबीसोबतची सात वर्षे माझ्या हृदयात; जिगरी दोस्त कोहलीची साथ सुटताच सिराज भावूक, राशीद खानची सुद्धा कमेंट
आरसीबीसोबतची सात वर्षे माझ्या हृदयात; जिगरी दोस्त कोहलीची साथ सुटताच सिराज भावूक, राशीद खानची सुद्धा कमेंट
Dhananjay Munde : नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nalasopara Achola Vasant nagri | नालासोपाऱ्यातील आचोळा वसंत नगरीत 41 इमारतींवर पालिकेची तोडक कारवाईAjit Pawar Full PC : मी ज्योतिषी नाही, मुख्यमंत्रि‍पदाच्या प्रश्नावर अजित पवार संतापले ABP MajhaShrikant Shinde Big News : एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार?ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 28 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर मी... मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 
अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर मी... मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 
नोकरीसाठी कबड्डीतही बोगस खेळाडूंचा सुळसुळाट; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गडांतर; चौकशीही मागणी
नोकरीसाठी कबड्डीतही बोगस खेळाडूंचा सुळसुळाट; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गडांतर; चौकशीही मागणी
Mohammed Siraj On RCB : आरसीबीसोबतची सात वर्षे माझ्या हृदयात; जिगरी दोस्त कोहलीची साथ सुटताच सिराज भावूक, राशीद खानची सुद्धा कमेंट
आरसीबीसोबतची सात वर्षे माझ्या हृदयात; जिगरी दोस्त कोहलीची साथ सुटताच सिराज भावूक, राशीद खानची सुद्धा कमेंट
Dhananjay Munde : नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
IPL 2025 : पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
राष्ट्रवादी अन शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद; शिंदेंना स्थान?; महाराष्ट्रातील विजयानंतर दिल्लीत खलबतं
राष्ट्रवादी अन शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद; शिंदेंना स्थान?; महाराष्ट्रातील विजयानंतर दिल्लीत खलबतं
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
Embed widget