एक्स्प्लोर

तमीम इकबालवर इंग्लंडमध्ये अॅसिड हल्ला, तातडीने स्पर्धा सोडली

लंडन: बांगलादेशचा धडाकेबाज सलामीवीर तमीम इकबालने एसेक्स कौंटी क्लब सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तमीम इकबालने आपल्यावर कथित अॅसिड हल्ला झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आपण कौंटी क्लब सोडत असल्याचं त्याने म्हटलं आहे. एसेक्स कौंटी क्लबकडून खेळणाऱ्या तमीमने टी 20 ब्लास्ट कौंटी चॅम्पियनशिपमध्ये एकाच सामन्यात सहभाग घेतला होता. काय आहे प्रकरण? बांगलादेशमधील दैनिक 'डेली स्टार'ने दिलेल्या वृत्तानुसार, पत्नी आयशा आणि एका वर्षाच्या मुलीसोबत तमीम एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेला होता. आयशाने हिजाब परिधान केला होता. हे तिघे हॉटेलमधून बाहेर येताच, काही संशयितांनी त्यांचा पाठलाग केला. इतकंच नाही तर त्यांनी तमीमसह त्याच्या कुटुंबावर अॅसिड फेकलं. मात्र सुदैवाने ते अॅसिड  त्यांच्या शरिरापर्यंत न पोहोचल्याने त्यांना इजा झाली नाही. सुरक्षेच्या कारणास्तव स्पर्धेला रामराम या घटनेमुळे धक्का बसलेल्या तमीम इकबालने थेट स्पर्धेलाच रामराम केला आहे.तमीम हा बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. तमीमने ब्लास्ट कौंटी चॅम्पियनशिपमध्ये एसेक्स कौंटी क्लबकडून एकच टी 20  सामना खेळला होता. रविवारी झालेल्या या सामन्यात, त्यांना सात विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 All Team Captain and Players List : CSK पासून RCB, MI पर्यंत... IPL साठी सर्व 10 संघांच्या कर्णधारांची नावे जाहीर; कुणाच्या खांद्यावर कोणत्या टीमची धुरा?, पाहा संपूर्ण यादी
CSK पासून RCB, MI पर्यंत... IPL साठी सर्व 10 संघांच्या कर्णधारांची नावे जाहीर; कुणाच्या खांद्यावर कोणत्या टीमची धुरा?
VIDEO : कुलदीप, चुकीच्या व्यक्तीला बोलावले...; त्याला लग्नात पाहाताच चहल जोरात ओरडला, धनश्रीसोबत थेट कनेक्शन, काय घडलं?
कुलदीप, चुकीच्या व्यक्तीला बोलावले...; त्याला लग्नात पाहाताच चहल जोरात ओरडला, धनश्रीसोबत थेट कनेक्शन, काय घडलं?
Pakistan Airstrike In Afghanistan Kabul : रमजान महिन्यात मृत्यूचा तांडव, अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंचा संताप; म्हणाले, पाकिस्तान अन् इस्रायलमध्ये कोणताही फरक नाही...
रमजान महिन्यात मृत्यूचा तांडव, अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंचा संताप; म्हणाले, पाकिस्तान अन् इस्रायलमध्ये कोणताही फरक नाही...
SRH IPL 2026 Team Playing XI: 20 षटकांत 300 धावा करण्याची ताकद; हैदराबादचा चक्रावणारा Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
20 षटकांत 300 धावा करण्याची ताकद;हैदराबादचा चक्रावणारा Squad, IPL 2026साठी अशी असेल Playing XI

व्हिडीओ

Farmer In UP's Firozpur Village Wears Bear : माकडांमुळे दशा, अस्वलाची वेशभूषा Special Report
Eknath Shinde Meet PM Modi : एकनाथ शिंदे दिल्लीत मोदींना भेटले, काय ठरलं? Special Report
Narendra Mehta : आरोपांचा सातबारा, सरकारकडून कोरा; पटोलेंचे गंभीर आरोप Special Report
Ahilyanagar Student Protest : अहिल्यानगरात स्माईलींग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन
Dhule LPG : धुळ्यात गॅसचा तुटवडा; मात्र राहुल कुलकर्णीच्या प्रयत्नामुळे बायोमासचा पर्याय उपलब्ध

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
धारवाडमध्ये हिमवर्षावस, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बिघतला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस
धारवाडमध्ये हिमवर्षावस, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बिघतला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
Pune News: धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
Embed widget