एक्स्प्लोर

Sharath Kamal : यंदा खेळरत्न पुरस्कारासाठी स्टार टेबल टेनिसपटू शरथ कमल नॉमिनेट!

भारताचा आघाडीचा टेबल टेनिस स्टार अचंता शरथ कमल (Achanta Sharath Kamal) याने नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये 3 सुवर्णपदकांसह एका रौप्यपदाकला गवसणी घातली.

भारताचा अत्यंत अनुभवी टेबल टेनिसपटू शरथ कमल (Sharath Kamal) याने कॉमनवेल्थ गेम्समध्ये (CWG 2022) अप्रतिम कामगिरी करत तीन सुवर्णपदकांसह एक रौप्य पदक मिळवलं. मागील बरीच वर्षे शरथ टेबल टेनिस खेळात भारताकडून कमाल कामगिरी करत असल्याने यंदा त्याला देशातील सर्वात मानाच्या खेळ रत्न (Khel Ratna) पुरस्काराचं नामांकन मिळालं असून लवकरच त्याला हा पुरस्कार प्रदान केला जाईल. शरथने कॉमनवेल्थमध्ये भारतासाठी तीन सुवर्ण पदकं आणि एक रौप्य पदक जिंकलं. त्याने टेबल टेनिसमध्ये पुरुष संघ, मिश्र दुहेरी आणि पुरुष एकेरी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं तर पुरुष दुहेरी प्रकारात रौप्य पदक मिळवलं होत.

विशेष म्हणजे महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रानंतर हा सर्वात मोठा सन्मान मिळवणारा दुसरा टेबल टेनिसपटू शरथ असणार आहे. यंदा खेळरत्न पुरस्कारासाठी नामांकन झालेला शरथ एकमेव खेळाडू आहे, दरम्यान क्रीडा समितीने 2020 मध्ये 5 आणि 2021 मध्ये 11 नावांची शिफारस केली होती. यंदा मात्र एकमेव शरथचं नाव समोर आलं आहे. याशिवाय तसेच अर्जुन पुरस्कारासाठी 25 नावांची शिफारस करण्यात आली होती. त्यात बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन, विश्वविजेता बॉक्सर निखत झरीन, अमित पंघल आणि CWG सुवर्णपदक जिंकणारा एल्डोस पॉल यांचा समावेश आहे. त्याशिवाय रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांना आजीवन श्रेणीतील द्रोणाचार्य पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. कुस्तीपटू बजरंग पुनियाचे प्रशिक्षक सुजित मान, मोहम्मद अली कमर, तिरंदाजी प्रशिक्षक जीवनज्योतसिंग तेजा आणि रायफल प्रशिक्षक सुमा शिरूर (पॅरा नेमबाजी) यांची नियमित श्रेणीतील द्रोणाचार्य पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे. 

अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केलेल्या भारतीय खेळाडूंची यादी

सीमा पुनिया (अॅथलेटिक्स), एल्डोस पॉल (अॅथलेटिक्स), अविनाश साबळे (अॅथलेटिक्स), लक्ष्य सेन (बॅडमिंटन), एचएस प्रणॉय (बॅडमिंटन), अमित पंघाल (बॉक्सिंग), निखत झरीन (बॉक्सिंग), भक्ती कुलकर्णी (बुद्धिबळ), आर प्रज्ञनंद (बुद्धिबळ), दीप ग्रेस एक्का (हॉकी), शुशीला देवी (ज्युडो), साक्षी कुमारी (कबड्डी), नयन मोनी सैकिया (लॉन बोल्स), सागर ओव्हाळकर (मल्लखांब), इलावेनिल वालारिवन (नेमबाजी), ओम प्रकाश मिथरवाल (शूटिंग), श्रीजा अकुला (टेबल टेनिस), विकास ठाकूर (वेटलिफ्टिंग), अंशू मलिक (कुस्ती), सरिता मोर (कुस्ती), परवीन (वुशू), मनशी जोशी (पॅरा बॅडमिंटन), तरुण धिल्लॉन (पॅरा बॅडमिंटन), स्वप्नील पाटील (पॅरा स्विमिंग) , जर्लिन अनिका जे (पॅरा बॅडमिंटन)

द्रोणाचार्य पुरस्काराची नामांकन

रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांना आजीवन श्रेणीतील द्रोणाचार्य पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. कुस्तीपटू बजरंग पुनियाचे प्रशिक्षक सुजित मान, मोहम्मद अली कमर, तिरंदाजी प्रशिक्षक जीवनज्योतसिंग तेजा आणि रायफल प्रशिक्षक सुमा शिरूर (पॅरा नेमबाजी) यांची नियमित श्रेणीतील द्रोणाचार्य पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे.  

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget