T20 World Cup 2021, IND vs PAK : आज पाकिस्तानविरोधातील सामन्यापासून भारतीय संघाच्या टी-20 विश्वचषकाच्या अभियानाला सुरुवात होणार आहे. पाकिस्तान संघानं आपल्या अंतिम 12 खेळाडूची घोषणा केलीय. भारतीय संघाच्या अंतिम 11 खेळाडूबाबत अद्याप संभ्रम असल्याचं दिसत आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताविरोधात भारतीय संघाचं पारडं जड आहे. आतापर्यंत पाकिस्तानविरोधात एकदाही भारतीय संघाचा पराभव झालेला नाही. ही भारतीय संघासाठी जमेची बाजू मानली जात आहे. पण टी-20 मध्ये काहीही होऊ शकतं हे विसरता कामा नये. बाबर आझमच्या संघाविरोधात विराट कोहलीचा संघ कसा सामना करतो, पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.
IND vs PAK : हाय-होल्टेज ड्रामा, विराटसेनेला बाबर रोखणार? भारतीय संघ पुन्हा साधणार 'मौका'
सामन्यापूर्वी विराट कोहलीनं म्हटलं आहे की, आम्ही विजयासाठी पूर्णपणे सकारात्मक आहोत. या सामन्याला आम्ही इतर सामन्यासारखंच पाहात आहोत. मला माहितीय की, बाहेर या सामन्याची खूप चर्चा आहे. पण आम्ही याबाबत जास्त विचार करत नाहीयेत. आमच्यासाठी हा सामना नेहमीसारखाच एक सामना आहे. ज्यात आम्ही नेहमीसारखं उत्तम खेळू. मैदानाबाहेर फार उत्साह, जोश असेल. पण खेळाडू म्हणून आम्ही पूर्ण ताकतीनं उतरु, असं विराट म्हणाला.
MS Dhoni : 'मेन्टॉर'सिंह धोनीच्या नव्या इनिंगकडे लक्ष, डगआऊटमधून टीम इंडियाच्या रथाचं सारथ्य करणार
भारतीय संघाची प्लेईंग जवळपास निश्चित
भारतीय संघाची प्लेईंग जवळपास निश्चित झाली आहे. फिरकी गोलंदाज कुणाला घ्यायचं, हा प्रश्न कदाचीत विराटला सतावत असेल. सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीनं हार्दिक पांड्या खेळणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे राहुल, रोहित, विराट, सूर्यकुमार, पंत आणि हार्दिक पांड्या या आघाडीच्या खेळाडूंना पाकिस्तानविरोधात खेळताना तुम्ही पाहू शकता. हार्दिक पांड्याला एका रात्रीत पर्याय शोधणं कठीण आहे. गरज भासल्यास तो दोन षटकं गोलंदाजी करु शकतो, असं विराट कोहलीनं पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. विराटच्या या वक्तव्यावरुन भारतीय संघ पाच गोलंदाज आणि सहा फलंदाज या सुत्राने मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट झालेय. दोन फिरकी आणि तीन वेगवान अशा पाच गोलंदाजांसह भारत खेळण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये रविंद्र जाडेजा, बुमराह आणि शामीचं स्थान निश्चित मानलं जात आहे. जाडेजासोबत दुसरा फिरकी गोलंदाज कोण? अनुभवी अश्विन की वरुण चक्रवर्ती अन् राहुल चहर यांची वर्णी लागणार... एका जागेसाठी या तीन गोलंदाजामध्ये कडवी चुरस पाहायला मिळेल. उर्वरित एका वेगवान स्थानासाठी भुवनेश्वर कुमार आणि शार्दूल ठाकूर यांच्यात चुरस आहे.
भारताविरोधात पाकिस्तानचा संघ (अंतिम 12) : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हॅरिस रॉफ, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, हैदर अली.