एक्स्प्लोर

टी-20 संघात कमबॅक, रैनाची नजर आता विश्वचषकावर

टी-20 मध्ये मिळालेल्या संधीचं सोनं करत भारतीय वन डे संघात स्थान मिळवण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

केपटाऊन : एका वर्षानंतर भारताच्या टी-20 संघात पुनरागमन केल्यानंतर सुरेश रैनाची नजर आता आगामी विश्वचषकावर आहे. टी-20 मध्ये मिळालेल्या संधीचं सोनं करत भारतीय वन डे संघात स्थान मिळवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये त्याने मोठी खेळी केली नाही. मात्र भारताला स्फोटक सुरुवात करुन दिली. शिवाय क्षेत्ररक्षणातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच तो आता वन डे संघातील पुनरागमनाच्या तयारीला लागला आहे. केपटाऊनमधील तिसऱ्या आणि अखेरच्या निर्णायक लढतीपूर्वी बोलताना सुरेश रैनाने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. ''सर्वात अगोदर ट्रॉफी जिंकणं महत्त्वाचं आहे. वरच्या फळीतील फलंदाज सध्या चांगली कामगिरी करत आहेत. तर मधल्या फळीतही महेंद्रसिंह धोनी आणि मनीष पांडेने चांगल्या धावा केल्या आहेत,'' असं रैना म्हणाला. ''तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यासाठी विराटने विश्वास दाखवला. पहिल्या सहा षटकांमध्ये धावा करणं गरजेचं असतं आणि आम्ही ते करत आहोत. तिसऱ्या सामन्यातही आमचा हाच प्रयत्न राहील,'' असं तो म्हणाला. ''विराटने वन डे आणि कसोटीतही भारताची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. ड्रेसिंग रुममध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. विश्वचषकासाठी आणखी बराच अवधी बाकी असल्याने मी कुठे फीट बसतो ते पाहणं महत्त्वाचं आहे. त्यापूर्वी आमच्याकडे श्रीलंकेतील तिरंगी मालिका आणि आयपीएल आहे,'' असं रैना म्हणाला. ''वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघाचा विजय महत्त्वाचा असतो. जेव्हाही संधी मिळते तेव्हा मी नेहमीच नैसर्गिक खेळी करतोच आणि त्यानंतर स्वतःच्या खेळाचं आकलनही करतो. आता माझ्यासाठी भारताचा प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे,'' असं रैनाने सांगितलं. ''दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा समारोप विजयाने करण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याचंही रैनाने सांगितलं. विराट कोणतीही गोष्ट एवढ्या सहजपणे घेत नाही. बैठकीत आमची यावरही चर्चा झाली. आमच्याकडे मार्गदर्शनासाठी रवी शास्त्री आणि धोनी यांच्यासारखे दिग्गज आहेत. त्यामुळे नक्कीच विजयी समारोप करु,'' अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

IND Vs WI 5th T20 Update : निर्णायक सामन्याचा निकाल लागला! नमन धीर-इशान किशननं मैदान गाजवलं, अन्... भारत-वेस्ट इंडिजच्या पाचव्या मॅचमध्ये नेमकं काय घडलं?
निर्णायक सामन्याचा निकाल लागला! नमन धीर-इशान किशननं मैदान गाजवलं, अन्... भारत-वेस्ट इंडिजच्या पाचव्या मॅचमध्ये नेमकं काय घडलं?
IND vs WI 5th T20 : बंगळुरुमध्ये पावसाचा हाहाकार! भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना 5 षटकांचा होणार? जाणून घ्या डेडलाईन
बंगळुरुमध्ये पावसाचा हाहाकार! भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना 5 षटकांचा होणार? जाणून घ्या डेडलाईन
Mumbai Indians IPL 2027 : मुंबई इंडियन्समध्ये मोठा उलटफेर! जयवर्धनेला नारळ, आता राहुल द्रविड होणार नवा कोच? तर रोहित शर्माकडे कर्णधारपद? चक्रावून टाकणारी Inside Story
मुंबई इंडियन्समध्ये मोठा उलटफेर! जयवर्धनेला नारळ, आता राहुल द्रविड होणार नवा कोच? तर रोहित शर्माकडे कर्णधारपद? चक्रावून टाकणारी Inside Story
IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget