Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आयसीसी क्रिकेटच्या पंचांच्या यादीत एकमात्र भारतीय
सुंदरम रवी या एकमेव भारतीय अंपायरचा २०१६-१७च्या आयसीसीच्या एलिट अंपायरच्या पँनेलमध्ये समावेश करण्यात आला आहे. ५० वर्षीय रवी हे मुळचे बंगळुरुचे रहिवाशी आहेत. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात २०११ साली कोलकत्याच्या इडन गार्डनवर झालेल्या इंग्लंड आणि भारत यांच्यातील टी२० सामन्याने केली. याच वर्षी वेस्ट इंडिज आणि भारत संघादरम्यान झालेल्या सान्यात त्यांनी अंपायरिंग केले. चितगांवमध्ये बांग्लादेश आणि न्यूझीलंड संघादरम्यान झालेल्या कसोटी सामन्याने त्यांनी कसोटी क्षेत्रात पदार्पण केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाराव्या स्थानी ऑस्ट्रेलियाच्या रॉड टकर हे आहेत. टकर यांनी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या टी२० सामन्यापासून अम्पायरिंगला सुरुवात केली. याच दोन संघादरम्यान झालेल्या एकदिवसीय सामन्यात त्यांनी अम्पायरिंग केले. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी कसोटी सामन्यासाठी अम्पायरिंगला सुरुवात केली.
इंग्लंडच्या रिचर्ड केटलबोरो यांचा आकरावा क्रमांक आहे. त्यांनी २००९ साली अम्पायरिंग क्षेत्रात पदार्पण केले. ऑगस्ट २००९ मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या टी२० सामन्यात त्यांनी पहिल्यांदा अम्पायरिंग केले. यानंतर २००९ मध्ये एकदिवसीय सामन्यासाठी त्यांना ही संधी मिळाली. तर २०१० साली त्यांनी कसोटी सामन्यांसाठी अम्पायरिंग करण्यास सुरुवात केली.
दहाव्या स्थानावर इंग्लडच्या रिचर्ड इल्लिंगवर्ल्ड आहेत. इल्लिंगवर्ल्ड यांनी इंग्लंडकडून ९ कसोटी तर २५ एक दिवसीय सामने खेळले. त्यानंतर ते अम्पायरिंग क्षेत्राकडे वळले. फेब्रुवारी २०१० साली कॅनडा आणि आफगाणिस्तादरम्यान झालेल्या एकदिवसीय सामन्यातून त्यांनी आपली दुसरी इनिंग सुरु केली. याच वर्षी त्यांनी टी२० सामन्यांसाठीही अम्पायरिंग केले. २०१२च्या त्यांनी कसोटी क्षेत्रात पदार्पण केले.
नववा क्रमांक पॉल रायफेल या ऑस्ट्रेलियन अंपायरचा आहे. रायफेल यांनी प्रदीर्घकाळ ऑस्ट्रेलियाकडून खेळून आपले गोलंदाजीचे कौशल्य सिद्ध केले. त्यांनी ऑस्ट्रेलियासाठी ३५ कसोटी आणि ९२ एकदिवसीय सामन्यांमध्ये मध्यम गती गोलंदाजी केली. त्यानंतर ते अंपायर या क्षेत्राकडे वळले. जानेवारी २००९ मधील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान झालेल्या टी२० सामन्यापासून अंपायरिंगला सुरुवात केली. तर याचवर्षातील ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दरम्यानच्या एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदा अम्पायरिंग केले. तर २०१२ साली त्यांनी कसोटी क्षेत्रात पदार्पण केले.
इंग्लंडच्या नायजेल लाँग यांचा आठवा क्रमांक आहे. लाँग यांनी २००५ साली इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या टी२० सामन्यातून अंपायरिंगच्या क्षेत्रात पदार्पण केले. २००६ साली पहिला एकदिवसीय तर २००८ सालातील कसोटी सामन्यात त्यांनी अम्पायरिंग केले.
सातवा क्रमांक दक्षिण आफ्रिकेच्या मरसाईस इरास्मुस यांचा आहे. इरास्मुस यांनी २००६ साली दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या टी २० सामन्यापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. २००७ साली एकदिवसीय तर २०१० साली कसोटी क्रिकेटमधून पदार्पण केले.
श्रीलंकेच्या कुमार धर्मसेना यांचा सहावा क्रमांक आहे. धर्मसेना यांनी आतापर्यंत 36 कसोटी, 70 अंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि 22 टी20 सामान्यांमध्ये अंपायरिंग केले आहे. त्यासोबतच त्यांनी श्रीलंकेकडून 31 टेस्ट आणि 141 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांनी अंपायरिंगच्या कारकीर्दीची सुरवात 2009 साली भारत आणि श्रीलंकेदरम्यान झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यापासून केली. २०१० सालीच्या कसोटी सामन्यात पहिल्यांदा अंपायरिंग केले.
इंग्लंडच्या इयान गउल्ड यांचा पाचवा क्रमांक आहे. गउल्ड यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून कारकीर्द सुरु केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी इंग्लंडकडून 18 एकदिवसीय सामने खेळल्यानंतर ते अंपायरिंग क्षेत्राकडे वळले. 2006 मध्ये इंग्लंड आणि श्रीलंका संघादरम्यान झालेल्या टी20 क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धेपासून अंपायरिंगची कारकीर्द सुरु केली. कसोटी क्रिकेटमध्ये अंपायरिंगसाठी त्यांना दोन वर्षे वाट पाहावी लागली.
चौथ्या क्रमांकावर क्रीस गफ्फनी या न्यूझीलंडच्या अंपायरचा समावेश आहे. गफ्फनी यांनी 2010 सालातील टी20 सामन्यापासून आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरु केली. त्याच वर्षी कॅनेडा आणि आयरलॅण्ड दरम्यानच्या झालेल्या सामन्याने त्यांनी आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधील अंपायरिंगला सुरुवात केली. 2014 रोजी त्यांनी झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या कसोटी क्रिकेटमध्ये अंपायर म्हणून काम पाहिले.
तिसरे नाव ऑस्ट्रेलियाचे ब्रूस ऑक्सनफोर्ड यांचे आहे. ब्रूस हे पंचांना देण्यात येणाऱ्या हॅण्ड शिल्डच्या वापरासाठी प्रसिद्ध आहेत. ऑक्सनफोर्ड यांनी 2006 साली टी20 थर्ड अंपायर म्हणून आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरु केली. 2008 साली त्यांनी पहिल्यांदा मुख्य अंपायर म्हणून काम केले. तर 2010 साली श्रीलंका आणि वेस्ट इंडिड दरम्यान झालेल्या कसोटी सामन्यात पहिल्यांदा अंपायरिंग केले.
सुंदरम रवी या एकमेव भारतीय अंपायरचा २०१६-१७च्या आयसीसीच्या एलिट अंपायरच्या पँनेलमध्ये समावेश करण्यात आला आहे. ५० वर्षीय रवी हे मुळचे बंगळुरुचे रहिवाशी आहेत. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात २०११ साली कोलकत्याच्या इडन गार्डनवर झालेल्या इंग्लंड आणि भारत यांच्यातील टी२० सामन्याने केली. याच वर्षी वेस्ट इंडिज आणि भारत संघादरम्यान झालेल्या सान्यात त्यांनी अंपायरिंग केले. चितगांवमध्ये बांग्लादेश आणि न्यूझीलंड संघादरम्यान झालेल्या कसोटी सामन्याने त्यांनी कसोटी क्षेत्रात पदार्पण केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -