बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे आजार
अभिषेक बच्चन : अभिषेक बच्चनला लहानपणी डिस्लेक्सिया नावाचा आजार होता. तो व्यवस्थित वाचू आणि लिहू शकत नव्हता. अभिषेककडून प्रेरित होऊनच आमीर खानने 'तारे जमीं पर' हा सिनेमा बनवला होता, असं म्हटलं जातं. तसंच या आजाराने पीडित मुलाच्या व्यक्तिरेखेचं नावही अभिषेक होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधर्मेंद्र : बॉलिवूडचे ही-मॅन म्हणजेच धर्मेंद्रही सुमारे 15 वर्ष डिप्रेशनमध्ये होते. यादरम्यान त्यांना दारुचं व्यसन लागलं होतं. धर्मेंद्र अल्कोहोलिक आहेत, हे सगळ्यांनाच माहित आहे. मात्र ते कधीतरी स्मोकिंगही करायचे. मात्र आता त्यांनी ते सोडलं आहे.
मनिषा कोईराला : मनिषा कोईरालाला डिसेंबर, 2012 मध्ये ओव्हेरियन कॅन्सर असल्याचं समजलं. यानंतर ती शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेत गेली होती. न्यूयॉर्कमध्ये सुमारे 6 महिने तिच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर 2 मे, 2013 रोजी कॅन्सरपासून मुक्त झाल्याचं मनिषाने सांगितलं. एकेकाळी बॉलिवूडची टॉप अभिनेत्री असलेली मनिषा पुनरागमनाची तयारी करत आहे.
सलमान खान : सलमान खानला ट्रायजेमिनल न्यूराल्जिया (Trigeminal Neuralgia) नावाचा आजार आहे. याची मोठे उपचारही त्याने घेतले आहेत. हा असा आजार आहे ज्यात व्यक्तीच्या चेहऱ्याच्या अनेक भागांमध्ये (डोकं, जबडा इत्यादी) प्रचंड वेदना होतात. सलमान अजूनही याच्या उपचारासाठी अमेरिकेला जातो. सलमानला मागील 8 ते 9 वर्षांपासून हा आजार आहे.
सोनम कपूर : बॉलिवूडमध्ये फॅशन आयकॉन अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या सोनम कपूरला जन्मत:च मधुमेह होता. दररोज इन्सुलिनचे डोस आणि विशेष डाएट केल्यानंतर तिने या आजारावर नियंत्रण मिळवलं. तिचं वजनही प्रचंड वाढलं होतं. सोनमला आता या आजारातून मुक्ती मिळाली असून वजनही कमी झालं आहे. सोनमसह आणखी सेलिब्रिटीजनीही गंभीर आजारातून स्वत:ची सुटका करुन घेतली आहे.
ऋतिक रोशन : 'बँग-बँग' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान हृतिक रोशनच्या डोक्याला दुखापत झाली होती, पण जखमी एवढी मोठी होती की शस्त्रक्रिया करावी लागील. हृतिकला क्रॉनिक सबड्यूरल हेमेटोमा (Chronic Subdural Haematoma) नावाचा आजार आहे. या आजारात रुग्णाला प्रचंड डोकेदुखी होते. इतकंच नाही तर हृतिकला अडखळत बोलण्याचाही आजार होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -