नवी दिल्ली : आईस क्रिकेट सेंट मॉरिज टूर्नामेंटसाठी संघांची घोषणा करण्यात आली आहे. दोन संघ या टूर्नामेंटमध्ये सहभाग घेत आहेत, ज्यांचं नाव डायनामोज आणि रॉयल्स असं आहे. डायनामोजची धुरा टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या, तर रॉयल्सची धुरा पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या खांद्यावर आहे.
या टूर्नामेंटमध्ये दोन सामने खेळवण्यात येतील, ज्याचं आयोजन 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी करण्यात आलं आहे. क्रिकेटला चालना देण्यासाठी अशा टूर्नामेंटचं आयोजन करण्यात येत आहे, ज्यामध्ये जगभरातील दिग्गज माजी खेळाडू खेळतील.
ही टूर्नामेंट क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणी आहे. कारण, या सामन्यांचं थेट प्रक्षेपणही केलं जाणार आहे. त्यामुळे या दिग्गज खेळाडूंच्या खेळाचा आनंद पुन्हा एकदा घेता येईल. सोनी ESPN आणि सोनी सिक्स या चॅनलवर दुपारी 4 वाजल्यापासून थेट प्रक्षेपण केलं जाईल.
वीरेंद्र सेहवागच्या संघात सर्वाधिक भारतीय खेळाडूंचा समावेश आहे, ज्यामध्ये झहीर झान, मोहम्मद कैफ, अजित आगरकर, जोगिंदर शर्मा आणि रोमेश पवार यांचा समावेश आहे. तर यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंचा क्रमांक लागतो, ज्यामध्ये तिलकरत्ने दिलशान, लसिथ मलिंगा आणि महेला जयवर्धने यांची निवड करण्यात आली आहे.
याशिवाय ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार माईक हसी आणि अँड्र्यू सायमंड हे देखील खेळताना पाहता येणार आहेत. तर स्वित्झर्लंडमधील भारतीय वंशाचा खेळाडू रोहन जैनचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
संघ :
डायनमोज : वीरेंद्र सेहवाग (कर्णधार), झहीर खान, मोहम्मद कैफ, अजित आगरकर, जोगिंदर शर्मा, रोमेश पवार, महेला जयवर्धने, तिलकरत्ने दिलशान, लसिथ मलिंगा, माईक हसी, अँड्रयू सायमंड आणि रोहन जैन.
रॉयल्स : शाहिद आफ्रिदी (कर्णधार), शोएब अख्तर, अब्दुल रझाक, जॅक कॅलिस, डॅनियल व्हिट्टोरी, ग्रॅम स्मिथ, नाथन मॅक्कलम, ग्रांट इलियट, मॉन्टी पनेसर, ओवेस शाह, मॅट प्रायर आणि अॅडन अँड्र्यूज.
आईस टूर्नामेंटसाठी संघांची घोषणा, सेहवाग-आफ्रिदी आमनेसामने
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Feb 2018 01:07 PM (IST)
डायनामोजची धुरा टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या, तर रॉयल्सची धुरा पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या खांद्यावर आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -