तर नोकिया 5च्या 3 जीबी व्हेरिएंट 13,499 रुपयांना लाँच करण्यात आला होता. मात्र, आता हा फोन 12,499 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच यात 1000 रुपयांची सूट देण्यात आली आहे.
नोकिया 8 स्मार्टफोनचे फीचर
नोकिया 8 मध्ये 5.3 इंच स्क्रीन देण्यात आली असून यामध्ये स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर चिप आहे. यात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 7.1 नॉगट या ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे.
या स्मार्टफोनमध्ये ड्यूल रिअर कॅमेरा असून दोन्हीचं रेझ्युलेशन 13 मेगापिक्सल आहे. तर फ्रंट कॅमेराही 13 मेगापिक्सल देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनमध्ये हायब्रिड ड्युल सिम सिस्टमही देण्यातआ आहे. तसेच याची बॅटरी 3090 mAh आहे.
नोकिया 5 स्मार्टफोनचे फीचर
नोकिया 5 मध्ये 5.2 इंच स्क्रीन आणि 720x1280 रेझ्युलेशन असणारं डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवय यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लासही देण्यात आली आहे. यामध्ये 16 जीबी इंटरनल स्टोरेज असून एसडी कार्डने 128 जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येऊ शकतं.
या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सल रिअर आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 430 चिपसेट असून यात 2 जीबी रॅमही देण्यात आली आहे. तसेच यात फिंगरप्रिंट सेंसर होम बटनही देण्यात आलं आहे.