Khelo India Youth Games 2022 : खेलो इंडिया 2022 स्पर्धेची (Khelo India Youth Games 2022) आज सांगता झाली. यंदा ही स्पर्धा हरियाणा येथील पंचकुला या ठिकाणी पार पडली. दरम्या न हरियाणा ही खेळाची राजधानी आहे. ती कायम तशीच राहावी, यासाठी हिस्सार, कर्नाल आदी ठिकाणी क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तसंच येथे खेल अकादमी देखील सुरू केली जाईल, अशी घोषणा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी यावेळी केली.
खेलो इंडिया यूथ गेम्सच्या समारोपावेळी मुख्यमंत्री मनोहर लाल यांच्यासह राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच केंद्रीय क्रीडा मंत्री अनुरागसिंग ठाकूर, हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीपसिंह आदी उपस्थित होते. यावेळी प्रथम क्रमांकावर असलेल्या हरियाणा आणि दुसऱ्या स्थानावरील महाराष्ट्र तसंच तिसऱ्या स्थानावरील कर्नाटकला समारंभपूर्वक चषक प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्राची दमदार कामगिरी
हरयाणा संघाने सर्वाधिक पदकं मिळवली असली तरी महाराष्ट्रानेही चांगली झुंज दिली. महाराष्ट्राच्या सर्वच खेळाडूंनी चांगलच मैदान गाजवलं. तब्बल 45 सुवर्णपदकं, 40 रौप्य आणि 40 कांस्यपदकावर नाव कोरल्यानंतर एक यशस्वी चमु म्हणून महाराष्ट्र स्पर्धेत नावारुपाला आला आहे. या कामगिरीमुळे सर्वच स्तरातून महाराष्ट्राच्या खेळाडूंचे कौतुक होत आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडिया स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत कांस्य आणि रौप्य पदकांसह सुवर्ण पदकांना देखील गवसणी घातली. आज स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी देखील महाराष्ट्राच्या मुलांसह मुलींच्या खो-खो संघाने सुवर्णपदक पटकावलं. विशेष म्हणजे दोन्ही संघानी अंतिम सामन्यात ओरिसाच्या संघाला पराभूत केलं. मुलींच्या स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर पंजाब आणि पश्चिम बंगाल राहिला. तर मुलांमध्ये पश्चिम बंगाल आणि दिल्लीला कांस्यपदक मिळाले. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राच्या खो-खो संघांनी सुवर्ण पदक पटकावत स्पर्धेचा शेवट गोड केला.
हे देखील वाचा-
- Khelo India Youth Games 2022 : खो-खोमध्ये महाराष्ट्रच अव्वल, मुलांसह मुलींनी पटकावलं सुवर्णपदक
- Khelo India Youth Games 2022 : महाराष्ट्राने खेलो इंडिया गेम्समध्ये 45 सुवर्ण पदकांसह रौप्य आणि कांस्य पदकांचाही पाडला पाऊस; मुख्यमंत्र्यांनीही दिली शाबासकी
- Kajol Sargar in Khelo India : सांगलीत पानपट्टी चालवणाऱ्याच्या मुलीला खेलो इंडिया स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक