IndiGo Transports Heart : वडोदरा ते मुंबई (Vadodara to Mumbai) हे अंतर तब्बल 412 किलोमीटर इतके आहे. हे अंतर पार करण्यासाठी साधारणपणे 7 ते 8 तास लागतात मात्र हे अंतर दोन तास 20 मिनिटात पार केल्याने मुंबईतील रुग्णाला  जीवदान मिळाले आहे. दरम्यान ही सर्व प्रक्रिया इंडिगोने (Indigo)  तीन तासाच्या आत पार पडली आहे. सोमवारी दोन्ही शहरांमध्ये वेगवेगळ्या विभागागांद्वारे ग्रीन कॉरीडॉर (Green Corridor) तयार करण्यात आला होता.  


इंडिगो एअरलाईन्सच्या टीमला वडोदरा ते मुंबई एका जिवंत हृदयाच्या (Live Heart) ट्रान्सपोर्टची जबाबादारी सोपवली होती. ही जबाबदारी इंडिगोनो (Indigo) यशस्वीरित्या पार करत एका रुग्णाला जीवदान दिले आहे. एअरलाईन्सच्या टीमला तीन तासाच्या आत हे हृदय मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयात (Global Hospital) पोहचवायचे होते. इंडिगोने हे हृदय दोन तास 20 मिनिटाताच हृदय रुग्णालयात यशस्वीरित्या पोहचवले. 


मुंबईतील परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि एका रुग्णाला जीवदान मिळाले. त्यानंतर ग्लोबल रुग्णालयाने इंडिगोच्या टीमचे आभार मानले. दरम्यान सदर हृदय हे वडोदऱ्याहून मुंबई येथे एका विमानाने नेण्यात आले आहे. दोन्ही शहरातील पोलिसांनी देखील ग्रीन कॉरीडॉरची व्यवस्था केली होती. दरम्यान हृद्य वडोदरा येथे पोहोचवण्यासाठी भारतीय एअरपोर्ट अथोरेटीने देखील या कामात मोठे सहकार्य केले आहे.  


या कामात यांचे महत्वाचे योगदान


दरम्यान वडोदरा ते मुंबईपर्यंत हृदय पोहोचवण्याच्या कामामध्ये  इंडिगोचे सिक्युरिटी मॅनेजर मनोज दळवी आणि अहमदाबाद एअरपोर्टचे रामचंद्र द्विदे यांनी या प्रक्रियेत मौलाचे मार्गदर्शन केले आहे. या शिवाय  ग्लोबल रुग्णालयाचे सिनिअर जनरल मॅनेजर ऑपरेशन अनुप लॉरेन्स म्हणाले की, इंडिगोने सुरक्षित आणि वेगाने हृदय विमान पोहचवले आहे.  काही महिन्यांपूर्वी इंडिगोने पुणे ती हैदराबाद फुफ्फुस पोहोचवले होते.


इतर बातम्या :


Trending : पायलट आई-मुलाच्या जोडीने विमान उडवत घेतली गगनभरारी! मुलाची आईबद्दल कृतज्ञता व्यक्त; हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल


Indigo Flight : विमानतळावर दिव्यांग मुलाला विमानात चढण्यापासून रोखल्याने संतापले विमान मंत्री सिंधिया, म्हणाले...


GAGAN : स्वदेशी नेव्हिगेशन सिस्टीम 'गगन'चा वापर यशस्वी, 'इंडिगो' ठरली लॅंडिंग करणारी पहिली एअरलाइन