एक्स्प्लोर

स्पेशल रिपोर्ट: करुण नायरचं त्रिशतक, 52 वर्षांनी विक्रम !

मुंबई/चेन्नई: करूण नायर कसोटी क्रिकेटमधला भारताचा दुसरा त्रिशतकवीर ठरला आहे. वीरेंद्र सहवागनं 2004 साली मुलतानच्या मैदानात पाकिस्तानविरुद्ध आणि मग 2008 साली चेन्नईच्या रणांगणात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीनशे धावांची वेस ओलाडंली होती. त्यानंतर आठ वर्षांनी आणखी एका भारतीय फलंदाजानं सहवागचा कित्ता गिरवला. त्या महापराक्रमी फलंदाजाचं नाव करुण कलाधरन नायर. करुणनं वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी हा पराक्रम गाजवला. त्यामुळं कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा तो सर्वात तरुण फलंदाजही ठरला. करुण नायरच्या त्रिशतकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कारकीर्दीतल्या पहिल्या कसोटी शतकाचं त्रिशतकात रुपांतर करणारा तो जगातला तिसरा फलंदाज ठरला. याआधी वेस्ट इंडिजच्या गॅरी सोबर्सनं 1958 साली आणि ऑस्ट्रेलियाच्या बॉबी सिम्पसन यांनी 1964 साली हा पराक्रम गाजवला होता. त्यानंतर तब्बल 52 वर्षांनी भारताच्या करुण नायरनं पहिल्या कसोटी शतकाचं त्रिशतकात रुपांतर करण्याचा योग जुळवून आणला. करुण नायरनं इंग्लंडच्या आदिल रशिदचा चेंडू सीमापार धाडून आपल्या पहिल्यावहिल्या त्रिशतकाला गवसणी घातली. करुणच्या 381 चेंडूंमधल्या नाबाद 303 धावांच्या खेळीला 32 चौकार आणि चार षटकारांचा साज होता. या खेळीदरम्यान त्याचा  स्ट्राईक रेट हा 79.52 असा जबरदस्त होता. वयाच्या 10 व्या वर्षापासूनच त्याच्या नसानसात क्रिकेट : करुणचे वडिल चेन्नई कसोटीत सलामीच्या लोकेश राहुलचं द्विशतक अवघ्या एका धावेनं हुकलं, पण करुणनं कमाल केली. त्यानं कारकीर्दीतल्या तिसऱ्याच कसोटीत थेट त्रिशतक  झळकावलं. इतकंच काय, पण करूणनं तीन-तीन मोठ्या भागीदारीही रचल्या. राहुलच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी 161 धावांची, अश्विनच्या साथीनं सहाव्या विकेटसाठी 181 धावांची आणि मग रवींद्र जाडेजाच्या साथीनं सातव्या विकेटसाठी 138 धावांची. त्यामुळंच भारतानं सात बाद 759 हा कसोटी क्रिकेटमधला सर्वोत्तम स्कोर उभारता आला. कर्नाटकचा हा युवा फलंदाज आज भारतीय क्रिकेटचा नवा नायक बनला आहे. पण पाच महिन्यांआधी याच करुण नायरला साक्षात मृत्यूशी दोन हात करण्याची वेळ आली होती. करूण मूळचा केरळचा आहे. 17 जुलैला तो आपल्या गावच्या उत्सवात सहभागी झाला होता. त्यावेळी नदी पार करून मंदिरात जाताना, करूणची नौका उलटली होती. पोहता येत नसल्यानं करूण बुडू लागला होता. पण तटरक्षक दलाच्या दक्ष जवानांनी त्याला मृत्यूच्या दाढेतून वाचवलं. करुण नायरच्या अपघाताची ती कहाणी ऐकली की आजही जीवाचा थरकाप उडतो. त्यामुळं करुण नायरचं  त्रिशतक कुणाला समर्पित करायचं, त्याचा जीव वाचवणाऱ्या तटरक्षक दलाच्या जवानांचा पर्याय पहिला असू शकतो. संबंधित बातम्या : मृत्यू जवळून पाहिला, मग त्रिशतकाचं ओझं कसलं: करुण नायर चेन्नईत ‘करुण’सह भारतानंही रचला विक्रम… करुणचं त्रिशतक, सेहवागचं हटके ट्विट इंग्लंडविरुद्ध करुण नायरचं त्रिशतक, भारताकडे 270 धावांची आघाडी वयाच्या 10 व्या वर्षापासूनच त्याच्या नसानसात क्रिकेट : करुणचे वडिल

महत्त्वाच्या बातम्या

Live सामन्यात भयंकर राडा, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला, मैदानावर वाद कशामुळं?
Live सामन्यात भयंकर वाद, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला
Team India : विराट कोहली आणि रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, श्रीलंकेविरुद्ध दोघे खेळणार, वनडे मालिका कधी सुरु होणार?
विराट आणि रोहितच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, हिटमॅन आणि किंग कोहली लवकरच मैदानात
Yashasvi Jaiswal Catch : मागे धावला, हवेत झेपावला अन् एका हाताने यशस्वी जैस्वालने अशक्य असा कॅच पकडला! टीम इंडियाचे सगळे खेळाडू चकित, कॉनवेही पाहतच राहिला, VIDEO
मागे धावला, हवेत झेपावला अन् एका हाताने यशस्वी जैस्वालने अशक्य असा कॅच पकडला! टीम इंडियाचे सगळे खेळाडू चकित, कॉनवेही पाहतच राहिला, VIDEO
IND vs NZ 2nd Test Day-3 Stump : जुरेलची एकाकी झुंज, टीम इंडियाची लाज वाचवली! बुमराहचीही प्रतीक्षा संपली; तरी न्यूझीलंडच वरचढ, तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?
जुरेलची एकाकी झुंज, टीम इंडियाची लाज वाचवली! बुमराहचीही प्रतीक्षा संपली; तरी न्यूझीलंडच वरचढ, तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi Fail To Convince DMK : डिलिमिटेशनचा 'खेळ', मिशन चेन्नई फेल! | Special Report ABP Majha
Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Live सामन्यात भयंकर राडा, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला, मैदानावर वाद कशामुळं?
Live सामन्यात भयंकर वाद, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
Gold Silver Rate : सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर 
सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर
Rohit Pawar : डिलिमिटेशनला विरोध असल्याचं आजच स्पष्ट करा, रोहित पवारांंचं सुप्रिया सुळेंना पत्र, धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर
रोहित पवारांच्या पत्रावर धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन्ही खासदार म्हणाले...
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
Delimitation : इंडिया आघाडीचे नेते आणि स्टॅलिन यांच्यात बैठक सुरु, द्रमुक निर्णयाचा फेरविचार करणार? राहुल गांधी आणि स्टॅलिन यांच्या गळाभेटीचा फोटो समोर
इंडिया आघाडीचे नेते आणि स्टॅलिन यांच्यात बैठक सुरु, द्रमुक निर्णयाचा फेरविचार करणार? देशाचं लक्ष चेन्नईकडे लागलं
Embed widget