Sourav Ganguly : भारतीय संघासाठी (Team India) दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) दौरा थोडा यशस्वीच राहिला असे म्हणता येईल. टीम इंडियाने (Team India) द. आफ्रिकेत खेळवण्यात आलेल्या वनडे मालिकेत दिमाखदार विजय मिळवला. शिवाय, खेळवण्यात आलेल्या एकाही मालिकेत भारताला पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान, भारताचा कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर कर्णधार रोहित आणि टीम इंडियाला टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यावरुन भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) टीम इंडियाच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत.
काय म्हणाले सौरव गांगुली?
दक्षिण आफ्रिकेतील भारतीय संघाच्या कामगिरीवर अनेकांनी सवाल केले. त्यानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी यावर टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे. गांगुली (Sourav Ganguly) म्हणाले, "भारताचा संघ अतिशय चांगला आहे. एखाद्या सामन्यात पराभव झाला की, टीम इंडियाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात. लोक असे काही बोलतात की वाटावे भारताचा संपूर्ण संघाची कामगिरी सुमार आहे. टीम इंडियाने वनडे, टी20 आणि कसोटी तिन्ही मालिकांमध्ये अतिशय चांगली कामगिरी केली आहे. हे अतिशय चांगले संकेत आहेत."
टी 20 मालिकेत बरोबरीत
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरुवातीला टी 20 मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेत 3 सामने खेळवण्यात आले. यावेळी टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे देण्यात आले होते. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाला या मालिकेत बरोबरी करण्यात यश आले. टी 20 मालिेकतील पहिला सामना पावसामुले खेळवण्यात आला नव्हता. उर्वरित दोन सामन्यांमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेने प्रत्येकी 1 विजय मिळवला. त्यामुळे भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा काहीअंशी यशस्वीच ठरला, असे म्हणता येईल.
आता अफगाणिस्तानविरोधात मैदानात उतरणार टीम इंडिया
भारतीय संघ पुढील मालिका अफगाणिस्तान विरोधात खेळणार आहे. 11 जानेवारीपासून भारत विरुद्ध अफगाणिस्तान दरम्यान तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होणार आहे.
कसोटी क्रिकेटमधील सर्वात छोटा सामना कोणता?
केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका (India Vs South Africa Test Match) यांच्यातील दुसरी कसोटी अवघ्या दीड दिवसात संपली. या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली. अतिशय कमी कालावधीत संपलेल्या या कसोटी सामन्यात काही विक्रमांची नोंदही झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Big Bash League : अंपायरच्या निर्णयामुळे सारेच झाले अचंबित; पहिल्यांदा दिले आऊट नंतर बदलला निर्णय