Big Bash League : आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलच्या एका फटक्याने बीग बॅश लीगमध्ये सर्वांना अचंबित करणारे प्रकार घडले आहेत. दरम्यान, शनिवारीही असाच एक प्रकार घडला. सिडनी सिक्सर्स आणि मेलबर्न स्टार्स दरम्यान झालेल्या सामन्यात थर्ड अपायरने चुकीचे बटन दाबल्यामुळे फलंदाजाला बाद घोषित करण्यात आले. मात्र, अपायरकडून लगेच हा निर्णय बदलण्यात आला. त्यामुळे मैदानावरिल सर्वच खेळाडू अचंबित झाले आहेत. हा सामना ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवण्यात आला होता.
कोणत्या षटकात घडला प्रकार?
सर्वांना हैराण करणारा हा प्रकार सिडनी सिक्रर्सचा संघ फलंदाजी करत असताना घडला. इमाद वसीने टाकलेल्या चेंडूवर जेम्स विंगने जोरादार शॉट मारला. दरम्यान, त्याने मारलेला चेंडू इमाद वसीमच्या हातावर लागला आणि त्यानंतर स्टम्प्सला लागला. त्यानंतर मेलबर्न स्टार्सच्या खेळाडूंनी जेम्सला बाद करण्यासाठी अपील केली. त्यामुळे मैदानावरिल अंपायरने 3rd अंपायरकडे जाण्याचा निर्णय घेतला.
3rd अंपायरने घातला घोळ
अपील 3rd अंपायरकडे गेल्यानंतर रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसत होते की, जोश फिलीप पूर्णपणे क्रिजच्या आतमध्ये आहे. मात्र, तरीही 3rd अंपायरने स्क्रीनवर आऊटचा इशारा दिला. अंपायरच्या या इशारामुळे सारे समालोचकही हैराण झाले होते. मात्र, यावेळी मैदानावरिल अंपायरने जोश फिलीपने थांबण्यास सांगितले आणि म्हणाले की, काहीतरी चुकतय. यानंतर थर्ड अंपायरनेही त्याचा स्क्रीनवरिल निर्णय बदलला आणि नॉट आऊटचा इशारा दिला.
सिडनी सिक्सर्सचा दणदणीत विजय
सामन्यात सिडनी सिक्सर्सकडून विंसने 57 चेंडूमध्ये 79 आणि डेनियल ह्युजेसने 32 चेंडूमध्ये 41 धावांची खेळी केली. या दोघांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर सिडनी सिकर्सनी मेलबर्नच्या संघाच 6 विकेट्सने पराभव केला. सिडनी सिक्सर्सकडून टॉड मर्फीने 2 तर टॉम करण आणि बेन द्वारशुईसने प्रत्येकी 1 विकेट पटकावली. यापूर्वी मॅक्सवेल आणि मार्कस स्टोयनिस आणि हिल्टन कार्टराईटच्या दमदार कामगिरीच्या जोरावर मेलबर्नचा संघ 20 षटकांअखेर 156 धावांपर्यंत मजल मारू शकला. हा सामना ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवण्यात आला होता.
आयपीएलमध्ये अनसोल्ड राहिला, बिग बॅश लीगमध्ये करतोय कमाल
बिग बॅश लीगमध्ये ही आयपीएलप्रमाणे जोरदार फटकेबाजी पाहायला मिळते. अनेक खेळाडू लांबलचक षटकार लगावताना दिसतात. असाच एक षटकार मेलबर्नच्या संघातील खेळाडून लगावलाय. ब्यू वेबस्टरने ब्रेंडन डोगेट गोलंदाजीसाठी आला असता 108 मीटरचा लांबलचक षटकार लगावलाय. षटकार मारल्यानंतर चेंडू स्टेडियमच्या सर्वात वरच्या भागात पडलाय. अॅडिलेड स्ट्राईकर्सने दिलेल्या 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 11 षटकात त्याने जोरदार फटकेबाजी केली. याच षटकात त्याने हा षटकार लगावला. बिग बॅश लीगच्या यंदाच्या हंगामातील हा सर्वात मोठा षटकार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
IND vs AFG : टीम इंडियात कुणाला संधी मिळणार? अफगाणिस्तानविरुद्धच्या T20 मालिकेत संघ कसा असेल?