एक्स्प्लोर
गेलसोबत 'चॅम्पियन' ब्राव्होचा धुमाकूळ!
मुंबई: वेस्टइंडिजचा अष्टपैलू खेळाडू डेव्हन ब्राव्होचं एक नवं गाणं यूट्यूबवर रिलीज करण्यात आलं आहे. ब्राव्होचं 'चॅम्पियन' हे गाणं आतंरराष्ट्रीय आणि भारतीय संगीताचा मिलाफ आहे.
नुकत्याच रिलीज झालेल्या या गाण्यानं युट्यूबवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत या गाण्याला तब्बल चार लाखाहून अधिक हिट्स मिळाले आहेत. या गाण्यात ब्राव्होसोबत वेस्टइंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल देखील थिरकला आहे.
गेल आणि ब्राव्हो हे दोघेही 'स्कोर चॅम्पियन सीरीज'चे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहेत. शुक्रवारी रिलीज करण्यात आलेल्या या गाण्याचे शब्द हिंदी आणि इंग्रजीमध्ये आहेत.
हे गाण रिलीज झाल्यानंतर ब्राव्हो म्हणाला की, 'ज्या पद्धतीनं हे गाणं तयार झालं त्यामुळे मी फारच खुश आहे. ख्रिस गेल आणि मी या गाण्याच्या वेळेस 'स्कोर'च्या टीमसोबत बरीच धमाल केली.'
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement