एक्स्प्लोर
Advertisement
IPL10 : श्रेयस अय्यर सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार!
मुंबई : दिल्ली डेअरडेव्हिल्सचा मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरला कांजिण्या आल्या आहेत. त्यामुळे त्याला आयपीएलमध्ये किमान पहिला आठवडाभर खेळता येणार नाही. त्याच्यावर सध्या मूंबईत उपचार सुरु आहेत.
उपचारानंतर आठवडाभराने श्रेयस पुन्हा सराव सुरु करू शकेल. 2015 साली श्रेयसने दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी भरीव कामगिरी बजावली होती. गेल्या मोसमात त्याला आपला ठसा उमटवता आला नाही. यंदा मात्र श्रेयस दमदार फॉर्ममध्ये आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात श्रेयसने द्विशतकही ठोकलं होतं. त्यामुळे दिल्ली डेअरडेव्हिल्सचा प्रशिक्षक राहुल द्रविडलाही श्रेयसकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती. श्रेयसचं आजारपण हा दिल्लीच्या टीमसाटी चौथा मोठा धक्का ठरला आहे.
याआधी जेपी ड्युमिनी आणि क्विन्टॉन डी'कॉक या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघातल्या दक्षिण आफ्रिकी शिलेदारांनी दुखापतींच्या कारणास्तव आयपीएलच्या यंदाच्या मोसमातून माघार घेतली आहे. तर दिल्लीचा श्रीलंकन शिलेदार अँजलो मॅथ्यूजच्या आयपीएलमधील सहभागावरही प्रश्नचिन्ह कायम आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
आरोग्य
आरोग्य
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets