Shoaib Malik-Saniya-Sana : पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) याने काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सना जावेद हिच्याशी तिसरे लग्न केले. यानंतर भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झा (Saniya Mirza)  हिला पाकिस्तानी लोकांकडून पाठिंबा मिळताना दिसत आहे. सना जावेदचेही हे दुसरे लग्न होते. सना आणि शोएब या दोघांनाही पूर्वीच्या जोडीदाराची साथ सोडून विवाह केल्याने सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानी लोक सानियाच्या घटस्फोटाच्या निर्णयाला सपोर्ट करत आहेत. 


शोएबशी विवाहबद्ध झालेल्या सना जावेदने एका वृत्तवाहिनीशी बोलताना मोठे खुलासे केले आहेत. सना जावेद म्हणाली की, "मी आणि शोएब गेल्या तीन वर्षांपासून एकत्र होतो. विवाहबद्ध असतानाही गेल्या 3 वर्षांत आमच्यातील संबंध चांगले होते." सनाने शोएब सोबत विवाह केला. त्यापूर्वी तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीबरोबर तिने ३ महिन्यांपूर्वीच घटस्फोट घेतला होता. शोएब मलिकला एखाद्या शो साठी आमंत्रित केले जायचे, तेव्हा तो एक अट ठेवायचा. सना जावेद उपस्थित असेल तरच मी येईल, अशी अट शोएब मलिककडून ठेवली जायची. सना आणि शोएबचे गेल्या 3 वर्षांपासून अफैर सुरु होते, असा दावा पाकिस्तानातील एका पॉडकास्ट चॅनेलने केला आहे. 


सना जावेदच्या पतीला देखील याची माहिती नव्हती. सानिया मिर्झा आणि तिच्या कुटुंबियांना याबरोबरच शोएब मलिकच्या कुटुंबियांना देखील गेल्या वर्षी याबाबत समजले. परस्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला, मात्र, शोएब मलिकने कोणाचेच ऐकले नाही, असे ही पाकिस्तानी वृत्तवाहिनीने स्पष्ट केले. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांनी 2010 मध्ये विवाह केला होता. तर सना जावेद आणि जस्वाल 2020 मध्ये विवाहबद्ध झाले होते. 


सना जावेदची कारकिर्द (Sana Javed)


सना जावेद (Sana Javed) ही एक कलाकार आहे. ती सिनेक्षेत्रात काम करते. सना पाकिस्तानमध्ये नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. उर्दू टेलीव्हिजनवर नेहमी झळकताना दिसली. सनाने 2012 मध्ये शहर-ए-जात मधून पदार्पण केले होते. त्यानंतर अनेक मालिकांमध्येही तिने काम केलं आहे. 'खानी'मध्ये तिने मुख्य भूमिका निभावली होती. याच्यासाठी तिला लक्स स्टाईल अवार्डसाठी नामांकन मिळाले होते. सना जावेदने (Sana Javed) 2020 मध्ये गायक उमर जैस्वाल याच्याशी विवाह केला होता. मात्र, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ते वेगळे झाले होते. दरम्यान, सना जावेद आणि शोएब मलिक यांनी विवाह केला असला तरीही सानिया सोबत त्याने घटस्फोट घेतलाय का? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Sania Mirza : शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नानंतर सानिया मिर्झाने केली पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले,"आम्ही तुझ्यासोबतच"