Sania Mirza First Post After Shoaib Malik Wedding : टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) सध्या चर्चेत आहे. शोएब मलिकने तिसरं लग्न केल्याने नेटकरी हैराण झाले आहेत. दरम्यान शोएबच्या तिसऱ्या लग्नानंतर सानियाने आता सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर चाहत्यांनी आम्ही तुझ्यासोबतच आहोत, असं म्हणत टेनिस स्टारला पाठिंबा दिला आहे.


सानियाची पोस्ट काय आहे? (Sania Mirza Post)


तिसऱ्या लग्नामुळे नेटकरी शोएब मलिकला ट्रोल करत आहेत. सना जावेदसोबत लग्न करण्याआधी शोएबने सानियासोबत संसार थाटला होता. शोएबच्या तिसऱ्या लग्नानंतर सानिया काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान सानियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सानियाने सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती आरशात पाहताना दिसत आहे. फोटो शेअर करत सानियाने खास कॅप्शन लिहिलं आहे. तिने लिहिलं आहे,"रिफ्लेक्ट". 






सानियाचा हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तिचा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. खूप सुंदर, आम्ही तुझ्यासोबतच आहोत, खूप-खूप आदर, देशाचा हिरा आहेस सू, क्वीन, आमचा आशीर्वाद आहे, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 


शोएब-सानियाचं बिनसलं?
 
शोएब मलिक आणि सानिया मिर्झा 2010 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. सानियाला इजहान नावाचा मुलगा आहे. गेल्या काही दिवसांपासून शोएब आणि सानियाचं बिनसलं असल्याची चर्चा आहे. तसेच त्यांचा घटस्फोट होणार असल्याच्याही चर्चा सुरू होत्या. 


सानियाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक रहस्यमय पोस्ट शेअर केली होती. तिने लिहिलं होतं,"लग्न अवघड आहे. घटस्फोटही अवघड आहे. वाढलेलं वजन अवघड बाब आहे. त्याप्रमाणे फिट राहणंदेखील गरजेचं आहे. कर्जबाजारी राहणं अयोग्य आहे. आयुष्यात कोणतीही गोष्ट सोपी नाही. पण योग्य मार्ग निवडणं तुमच्या हातात आहे". आता शोएबने सना जावेदसोबत तिसरं लग्न केलं आहे. 


संबंधित बातम्या


Shoaib Malik And Sana Javed: शोएब आणि सना यांच्या लग्नानंतर 'तो' व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "दोघेही धोकेबाज