मुंबई: 'रावळपिंडी एक्सप्रेस'च्या नावाने प्रसिद्ध असलेला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने स्वत:च्या जीवनावर आधारीत चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी त्याने आपल्या भूमिकेसाठी बॉलीवूडचा दबंग सलमान खानला पसंती दिली आहे.

 

'भाग मिल्खा भाग'पासून मेरी कॉम, अजहर आणि आता सुल्तान असा खेळाडूंच्या जीवनावर आधारीत चित्रपट बनवण्याचा ट्रेंड सुरु आहे. या ट्रेंडवर इंडियन मजाक लीगचा जज शोएब अख्तर खुपच आनंदी पाहायला मिळत आहे.

 

यासंबंधीच त्याला विचारले असता, त्यानेही आपल्या जीवनावर चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त केली. पण या चित्रपटात सलमान खानच आपल्या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकतो, असे म्हणले आहे.

 

शोएब अख्तर भारतीय फिरकी गोलंदाज हरभजन सिंगसोबत इंडियन मजाक लीग हा रिअॅलिटी शो जज करणार आहे. हा कार्यक्रम लाइफ ओकेवरून प्रसारीत होणार आहे.